चार नवीन वंदे भारत लवकरच प्रवाशांच्या सेवेत.
पंतप्रधान मोदींकडून चारही वंदे भारतला हिरवा कंदील.
नेमकं कुठून कुठे धावणार?
वंदे भारत एक्स्प्रेस या नवीन युगातील रेल्वे प्रवासाचा चेहरा बनल्या आहेत. ज्याचा उद्देश कमी ते मध्यम अंतरावर अधिक प्रीमियम आणि जलद रेल्वे प्रवास अनुभव देणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतीय रेल्वेच्या महत्वाच्या मार्गांवर चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या वाराणसी - खजुराहो, बंगळूरू - एर्नाकुलम, लखनऊ जंक्शन - सहारापूर आणि फिरोदपूर कॅन्ट - दिल्ली या मार्गांवर धावतील.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व वंदे भारत गाड्या वातानुकूलित आणि स्वयंचलित असून, या गाड्यांचा कमाल वेग १८० किमी प्रतितास आहे. दरम्यान, अधिकृत परवानगी असलेल्या मार्गांवर त्या १६० किमी प्रतितास वेगाने धावतील.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या चेअर कार सेवेमध्ये प्रवाशांसाठी विमानासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. वैयक्तिक वाचन दिवे, बायो व्हॅक्युम टॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, युरोपियन शैलीतील बैठक व्यवस्था, एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फिरणारी आसनं, रूंद सामान रॅक, आपत्कालिन कॉल बटण आणि मॉड्यूलर मिनी पेंट्री या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस मार्ग आणि वेळापत्रक
फिरोजपूर कॅन्ट- दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस
सुरूवात - फिरोजपूर कॅन्टहून सकाळी ७:५५
पोहोच - दिल्ली दुपारी २:३५
थांबे - फरीदकोट, भटिंडा, धुरी, पटियाला, अंबाला कॅन्ट, कुरूक्षेत्र, पानीपत
परतीची गाडी - दिल्लीहून दुपारी ४वाजता, फिरोजपूरला रात्री १० वाजून ३५ मिनिटावर पोहोचेल.
वार - बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सुरू.
वाराणसी - खजुराहो वंदे भारत एक्स्प्रेस
सुरूवात - वाराणसी - सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सुटेल.
पोहोच - खजुराहो - दुपारी १ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.
थांबे - विंध्याचल, प्रयागराज, छेओकी, चित्रकूट धाम, बांदा, महोबा.
परतीची गाडी - खजुराहोहून दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी गाडी सुटेल, वाराणसीला रात्री ११ वाजता पोहोचेल.
वार - गुरूवार वगळता आठवड्यातून सहा दिवस.
बंगळुरू - एर्नाकुलम वंदे भारत एक्स्प्रेस
सुरूवात - केएसआर बंगळुरू - सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुटेल.
पोहोच - एर्नाकुलम – दुपारी १:५० पोहोचेल.
थांबे - कृष्णराजपुरम, सेलम, इरोड, तिरुप्पूर, कोयंबतूर, पलक्कड आणि त्रिशूर स्थानकांवर थांबेल.
परतीची गाडी- एर्नाकुलमहून दुपारी २:२०, बेंगळुरूला रात्री ११:०० वाजता पोहोचेल.
वार - बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सुरू
लखनऊ जंक्शन - सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेस
सुरुवात - लखनऊ - पहाटे ५:०० वाजता निघेल.
पोहोच - सहारनपूर - दुपारी १२:४५ पोहोचेल.
थांबे - सीतापूर, शाहजहांपूर, बरेली, मुरादाबाद, नजीबाबाद आणि रुरकी स्थानकांवर थांबेल.
परतीची गाडी - सहारनपूरहून दुपारी ३:००, लखनौला रात्री ११:०० वाजता पोहोचेल.
वार - सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.