लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

Marriage and Breast Size: लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो का? तज्ज्ञ सांगतात हा गैरसमज आहे. स्तनांतील बदल हे गर्भधारणा, वेट गेन आणि हार्मोनल बदलांमुळे होतात.
Marriage and Breast Size
Marriage and Breast SizeSaam
Published On

ऑफिसचं काम असो किंवा घरचं. आजच्या महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवत आहेत. त्या आपल्या आरोग्याबरोबर व्यक्तिमत्त्वाची काळजी घेतात. स्वत: ला फिट ठेवतात. स्वत:कडे लक्ष देतात. मात्र, लग्न झाल्यानंतर महिलांच्या आयुष्यात काही गोष्टींमध्ये बदल होतात. लग्नानंतर महिलांच्या शरीरात बरेच बदल होतात. पण महिलांच्या शरीराशी संबंधित काही गोष्टी गूढ मानल्या जातात. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे, लग्नानंतर महिलांच्या स्तानांचा आकार वाढतो का?

लग्नानंतर महिलांच्या स्तनांचा आकार वाढतो का?

दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्वेता गुप्ता सांगतात की, 'लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो, हा गैरसमज आहे. स्तनांचा आकार अनुवांशिक आणि हार्मोनल घटकांवर अवलंबून असतो. त्याचा लग्नाशी किंवा लैंगिक आयुष्याशी काहीही संबंध नाही. काही वेळा स्तनांच्या आकारामध्ये दिसणारे हे बदल गर्भधारणा, वजन वाढणे, किंवा औषधांच्या परिणामांमुळे होऊ शकते'.

Marriage and Breast Size
धक्कादायक! महिला काँग्रेस नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल, AIनं तयार केला अन्.. नेमकं घडलं काय?

लग्नानंतर महिला जर गर्भवती राहिली तर, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स वाढतात. यामुळे स्तनांमधील दुधाच्या ग्रंथी विकसित होतात. स्तनांचा आकार तात्पुरता वाढतो. हा बदल लग्नाशी नसून गर्भधारणेशी संबंधित आहे. बऱ्याचदा वजन वाढल्यानेही स्तानांचा आकार वाढतो. कमी शारीरिक हालचाल आणि व्यायामाचा अभाव, यामुळे वजन वाढते आणि स्तनांचा आकारही वाढतो.

Marriage and Breast Size
शिवसेना शिंदेसेनेला भाजपकडून जोरदार झटका; दोन बड्या नेत्यांची कमळाला साथ, काँग्रेसलाही खिंडार

हार्मोनल बदलांमुळेही स्तनांचा आकार वाढू शकतो. स्ट्रेस औषधे किंवा आरोग्याशी संबंधित इतर कारणांमुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होते. शरीरात होणारे हे बदल स्तनांच्या आकारावर परिणाम करू शकतात. पण याचा लग्नाशी थेट संबंध नाही. तसेच बाळंतपणानंतर दूध निर्माण होण्याच्या प्रक्रियेमुळे काही काळासाठी स्तनांचा आकार मोठा होता. मात्र, हा बदल तात्पुरता असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com