शिवसेना शिंदेसेनेला भाजपकडून जोरदार झटका; दोन बड्या नेत्यांची कमळाला साथ, काँग्रेसलाही खिंडार

Political Earthquake in Nandurbar: निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला नंदुरबारमध्ये खिंडार. अक्कलकुवा तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांचा शिवसेनेला राम राम. भाजपमध्ये प्रवेश.
Political Earthquake in Nandurbar
Political Earthquake in NandurbarSaam
Published On
Summary
  • नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदेसेनेला धक्का

  • २ माजी सरपंचांचा शिंदेसेनेला जय महाराष्ट्र

  • भाजपचं कमळ घेतलं हाती

बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडेल. तर, ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेना शिंदे गटातील सरपंच, उपसरपंच यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील २ सरपंच यांनी शिवसेना शिंदे गटाला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Political Earthquake in Nandurbar
महाआघाडीत भूकंप; शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडणार? तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय

शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकुवा विधानसभेचे आमदार आमश्या पाडवी यांचे खंदे समर्थक, काकडखुंटचे माजी सरपंच विनोद वडवी आणि सोनपाटीचे माजी सरपंच कुवरसिंग पाडवी यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केलं आहे. त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

Political Earthquake in Nandurbar
निवडणुकीपूर्वी भंयकर घडलं; बड्या नेत्यासह पत्नी अन् मुलीचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना आणि काँग्रेसच्या उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपची साथ दिली. भाजप नेत्या हिना गावित यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडलं असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com