महाआघाडीत भूकंप; शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडणार? तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय

Tensions Rise in MVA Nagpur Unit: नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे. काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव न आल्याने राष्ट्रवादीने समविचारी पक्षांसोबत तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू केलीये.
Tensions Rise in MVA Nagpur Unit
Tensions Rise in MVA Nagpur UnitSaam Tv News
Published On

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. नुकतंच नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र, नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस सोबत न राहता समविचारी पक्षांसोबत तिसऱ्या आघाडीची तयारी करत आहे. शरद पवार गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

प्रवीण कुंटे पाटील म्हणाले, 'महाविकास आघाडीत राहून निवडणुका लढण्याचा आम्ही प्राधान्य देतो. मात्र, काँग्रेसकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव मिळलेला नाही. त्यामुळे आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेससोबत विधानसभेतील अनुभव समाधानकारक नसल्यानं आता समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमचा विचार आहे', असं कुंटे पाटील म्हणाले.

Tensions Rise in MVA Nagpur Unit
सोन्याच्या भावाच्या तेजीला ब्रेक; १० तोळं सोनं ७,१०० रूपयांनी स्वस्त, पाहा आजचे लेटेस्ट दर

कुंटे म्हणाले, 'राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची भाषा आणि आशिष शेलार यांची भाषा यात काही फरक जाणवला नाही. भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाचा काहीतरी साठ-लोट आहे', असा संशयही कुंटे पाटील यांनी व्यक्त केला. 'निवडणुकीच्या कामाला आम्ही आधीपासूनच लागलो आहे'.

Tensions Rise in MVA Nagpur Unit
'शंकर महाराज अंगात येतात' पुण्यातील दांपत्याची फसवणूक; कुटुंबाची १४ कोटी रुपयांची फसवणूक

'मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढलो. त्याच धरतीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढू अशी आमची भूमिका पूर्वी पण होती आणि आज पण आहे. आम्हाला सोबत घेऊन जायची नसेल तर आम्हाला तिसरी आघाडी म्हणजे समविचारी पक्षांना घेऊन सोबत जाण्याची आमची इच्छा आहे', असं कुंटे म्हणाले.

'उद्धव ठाकरेंची शिवसेना, बच्चू कडू यांचा प्रहार, अशा सगळ्या समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी म्हणून समोर जाण्याचा आमचा विचार आहे', असंही कुंटे म्हणाले. 'आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख हे विदर्भाचे नेते आहे, आणि राज्य नेतृत्वाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणाशी आघाडी करायची याचे अधिकार दिले आहे. सोबत लढायचं की नाही हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे.... काँग्रेसने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नाही...आमची भूमिका स्पष्ट आहे', असं कुंटे म्हणाले.

'पहिले आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्राधान्य देऊ, पण काँग्रेसला आमची गरज वाटत नसेल तर, आम्ही समविचारी पक्षांना घेऊन निवडणुकीला समोरे जाऊ', असं कुंटे पाटील म्हणाले. 'काँग्रेसकडून आम्हाला आतापर्यंत कुठल्याही प्रपोजल आलं नाही... आम्हाला निवडणुका लढायचे आहे', असंही कुंटे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com