लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख

Kalyan-Dombivli Ring Road Project: कल्याण डोंबिवलीतील रिंगरोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला वेग. आयुक्त अभिनव गोयल यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
Kalyan-Dombivli Ring Road Project
Kalyan-Dombivli Ring Road ProjectSaam Tv
Published On
Summary
  • कल्याण-डोंबिवलीकरांसाठी खुशखबर!

  • रिंगरोड प्रकल्पाला गती

  • प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. यामुळे प्रवाशांचा तासंतास वेळ जातो. दरम्यान, लवकरच वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार आहे. रिंगरोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग आला आहे. गोविंदवाडी बायपास ते मोठागाव मानकोली पुलापर्यंतचा हा टप्पा पुढील आठ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सुरू असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. अशी माहिती आयुक्त गोयल यांनी दिली. या मार्गावरील अडथळ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पाविषयी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

Kalyan-Dombivli Ring Road Project
विरारचा प्रवास वेगात होणार, निवडणुकीआधी सरकारने घेतला मोठा निर्णय, मुंबईसह पुण्यासाठी महत्त्वाची घोषणा

यावेळी पुनर्वसन आणि मोबदला प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेऊन जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, अशी माहिती अभिनव गोयल यांनी दिली. या रिंगरोडच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, मानकोली परिसरातील वाहतूक सुलभ होणार.

प्रवाशांचा वेळ वाचणार. तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Kalyan-Dombivli Ring Road Project
लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून महागड्या दुचाकीच्या स्पीडो मीटरची चोरी

पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही. सोने, चांदी, मोबाईल पाठोपाठ आता महागड्या दुचाकीचे स्पीडोमीटरची चोरी होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पुण्यातील धनकवडी परिसरात डिलिव्हरी बॉयने एका सोसायटीमध्ये प्रवेश घेत महागड्या दुचाकीचे मीटर चोरी केल्याची घटना समोर आली. या घटनेचा CCTV समोर आला असून, त्यानुसार या डिलिव्हरी बॉयने डिलिव्हरीच्या नावाखाली प्रवेश केला आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बाईकचे मीटर तोडून पळून गेला. ही सगळी घटना ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता घडलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com