Maharashtra Rain News Update Saam Tv
देश विदेश

Rain Alert: पुढचे ७ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार; महाराष्ट्रासह २० राज्यांना इशारा

Maharashtra Rain News Update: महाराष्ट्रासह देशातील २० राज्यांना हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यांसाठी पुढचे ६ दिवस महत्वाचे असणार आहे.

Priya More
  • महाराष्ट्रासह देशातील २० राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार

  • या राज्यांसाठी पुढील सात दिवस महत्वाचे राहणार आहे

  • बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाची शक्यता

  • कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये अतिवृष्टीची शक्यता

मान्सून देशात आता चांगलाच सक्रीय झाला आहे. अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. काही राज्यात पावसाने हाहाकार केला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढचे काही दिवस महत्वाचे असणार आहे. अशातच वायव्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ५-६ जुलै रोजी छत्तीसगड, मध्य प्रदेशात, ५ जुलै रोजी ओडिशामध्ये, ५ ते ७ जुलै दरम्यान कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये, तसेच ५ जुलै रोजी सौराष्ट्र आणि कच्छमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने खात्याने काही राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम भारतामध्ये ५-११ जुलै दरम्यान कोकण, गोवा, ५-८ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र, ५-६ जुलै दरम्यान मराठवाडा आणि सौराष्ट्र, कच्छ, ५-९ जुलै दरम्यान गुजरातमध्ये मोठ्या भागात पावसाची शक्यता आहे. ९-११ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र, ७-११ जुलै दरम्यान मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छ, १०-११ जुलै दरम्यान गुजरातमध्ये पाऊस पडणार आहे. ५-११ जुलै दरम्यान किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, तेलंगणा, ५ आणि ६ जुलै, १०-११ जुलै रोजी लक्षद्वीप, ८-११ जुलै दरम्यान उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

५ आणि ६ जुलै रोजी जम्मू आणि काश्मीर, लडाखमध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल. ५ आणि ६ जुलै रोजी हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ आणि ८ जुलै दरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल. ५ आणि ८ जुलै दरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. ५ आणि ८ जुलै दरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ आणि ८ जुलै दरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. ७ आणि ८ जुलै दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी पाऊस पडेल. ५ आणि ८ जुलै दरम्यान पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

बिहारमध्ये ५-११ जुलै, ओडिशामध्ये ८-११ जुलै, अंदमान आणि निकोबार बेटांवर ७-११ जुलै, गंगा मैदानी प्रदेशासह पश्चिम बंगालमध्ये ५-७ जुलै, झारखंडमध्ये ५-९ जुलैदरम्यान काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ जुलै रोजी बिहारमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांसाठी ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ५-६ जुलै दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये जोरदार पाऊस पडेल. ७-११ जुलै दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये पाऊस पडेल, तर ५-११ जुलै दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: या 5 राशींना मिळणार यश, तर काहींना सावध राहण्याचा इशारा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Mumbai Waterfalls : पावसाळ्यात सह्याद्रीच्या कुशीतून वाहणारे धबधबे, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहेत 'ही' ५ सुंदर ठिकाणे

Maharashtra News Live Update: नालासोपारा पूर्वेकडील वाकनपाडा परिसरात घरावर कोसळलं भलं मोठे झाड

घरच्या घरी बनवा चविष्ट गाजरची झणझणीत भाजी; एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Politics: आमदाराला 20 कोटींच्या ऑफर; संजय राऊतांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेत्यानं केली ऑफरची पोलखोल

SCROLL FOR NEXT