पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे पावसामुळे ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी शेतशिवार पाण्याखाली गेले आहे. तर शेतातून वाहणाऱ्या पाण्यामुळे ओढ्याचे रूप धारण केले. गावातील प्रमुख रस्तेही पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. एवढेच नव्हे तर ग्रामदेवतेच्या मंदिरातही पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, खेड तालुक्यातील चाकण येथे मुसळधार पावसानंतर साईड गटार तुंबल्याने पावसाचे पाणी थेट पुणे-नाशिक महामार्गावर आले. त्यामुळे महामार्ग जलमय झाला असून वाहनचालकांना पाण्यातूनच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.