Kalyan Rain: कल्याण-भिवंडीत पावसाचा हाहाकार, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू

Kalyan- Bhiwandi Rainfall: कल्याण-भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाने दोघांचा बळी घेतला. विजेचा धक्का लागून दोघांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
Kalyan Rain: कल्याण-भिवंडीत पावसाचा हाहाकार, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू
Kalyan RainSaam Tv
Published On
  • कल्याण आणि भिवंडीत मुसळधार पाऊस

  • पावसादरम्यान दोन जणांचा मृत्यू

  • उघड्या पडलेल्या वीज वाहिन्यांमुळे विजेचा शॉक

  • कल्याणमध्ये महिलेचा तर भिवंडीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण आणि भिवंडीमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या पावसाने २ जणांचा बळी घेतला. मुसळधार पावसात घराबाहेर पडले असता विजेचा धक्का लागून एक महिला आणि तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे कल्याण आणि भिवंडीमध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिला आपल्या मुलांसाठी खाऊ आणण्या जात असताना ही घटना घडली. तर काम करत असताना २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात बुधवारी मुसळधार पावसादरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेचा रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या वीज वाहिनीच्या शॉकने जागीच मृत्यू झाला. शशी राहुल चक्र असे मृत महिलेचे नाव असून या घटनेनंतर महावितरणच्या कथित निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Kalyan Rain: कल्याण-भिवंडीत पावसाचा हाहाकार, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू
Rainfall Alert : सतर्क राहा! पुढचे ७ दिवस धो-धो कोसळणार, IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

शशी चक्र या पती राहुल चक्र आणि दोन लहान मुलांसह हनुमान नगर परिसरात राहत होत्या. बुधवारी पावसादरम्यान त्या मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यावेळी रस्त्यावर महावितरणची वीज वाहिनी उघड्यावर पडलेली होती. पावसाच्या पाण्यात करंट पसरल्याने त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला. स्थानिकांनी मदतीचा प्रयत्न केला मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा तपास टिळक नगर पोलिस करत आहेत.

Kalyan Rain: कल्याण-भिवंडीत पावसाचा हाहाकार, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू
Maharashtra Rain: सर्वसामान्यांना मोठा झटका! भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ, पावसामुळे भाज्यांची आवक घटली

तर, भिवंडीत देखील अशीच घटना घडली. चौहान कॉलनीतील २६ वर्षीय तरुणाचा विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झालाय. दीड वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं. भिवंडीतील चौहान कॉलनीतील हनुमान मंदिरासमोर राहणारा मुश्तफा रज्जब शेख याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मुश्तफा हा येथील गोपाल स्वीट हाऊसाठी लग्न आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये कॅटरिंगचं काम करत होता. कार्यक्रमांसाठी लागणारी भांडी आणि साहित्य मंदिर परिसरात ठेवली जात होती.

Kalyan Rain: कल्याण-भिवंडीत पावसाचा हाहाकार, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू
Maharashtra Rainfall : मान्सूनचा राज्यातून निरोप, पण वादळी पावसाचा इशारा; पुढचे ४ दिवस धो-धो कोसळणार

बुधवारी तोही तिथे भांडी उतरवण्यासाठी गेला होता. त्याच दरम्यान उघड्या पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तातडीने स्वर्गीय इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. मुश्तफाच्या पश्चात पत्नी आणि फक्त दीड वर्षांची एक छोटी मुलगी आहे. या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Kalyan Rain: कल्याण-भिवंडीत पावसाचा हाहाकार, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू
Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, रेल्वे उशिराने; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com