Mumbai local train: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! आता CSMT ते कल्याण मार्गावर धावणार आणखी 12 एसी लोकल, जाणून घ्या नेमकं काय बदलणार?

मध्य रेल्वेने CSMT ते कल्याण मार्गावर 12 नवीन एसी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसी लोकलची संख्या वाढणार असून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळणार आहे. वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
Mumbai local train
Mumbai local trainSaam Tv
Published On

मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण या मुख्य मार्गावर आणखी 12 एसी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. या नव्या सेवांमुळे मुख्य मार्गावरील एसी लोकलची संख्या 80 वरून 92 होणार आहे. तर मध्य रेल्वेच्या संपूर्ण उपनगरीय नेटवर्कमध्ये धावणाऱ्या एसी लोकलची संख्या 108 वरून 120 पर्यंत वाढणार आहे.

लवकरच सुरू होणार नव्या एसी लोकल सेवा

रेल्वे प्रशासनाने या नव्या एसी लोकल सेवा लवकरच सुरू करण्याची तयारी केलीये. गेल्या दोन महिन्यांपासून मध्य रेल्वेकडे एक एसी लोकल रेक वापराशिवाय पडून होता. आता त्याच रेकचा प्रवाशांच्या सेवेसाठी वापर केला जाणार आहे. या नव्या लोकलचं वेळापत्रकही रेल्वेकडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीये.

Mumbai local train
Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

काही साध्या लोकल बंद करून त्यांच्या जागी एसी लोकल

या निर्णयानुसार, सध्या धावणाऱ्या काही नॉन-एसी लोकल सेवा बंद केल्या जाणार आहेत. त्यांच्या जागी एसी लोकल चालवण्यात येतील. विशेष म्हणजे, सकाळी आणि संध्याकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळेत CSMT ते कल्याण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्षात घेऊन या नव्या सेवा सुरू केल्या जाणार आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षिततेवर रेल्वेचा भर

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, एसी लोकलची संख्या वाढवण्यामागचा मुख्य उद्देश प्रवाशांचा सुरक्षित आणि आरामदायी प्रवास हा आहे. एसी लोकलमध्ये ऑटोमॅटीक दरवाजे असल्यामुळे प्रवाशांना दरवाज्यात किंवा फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करता येत नाही. त्यामुळे चालत्या ट्रेनमधून पडून होणारे अपघात कमी करण्यास मदत होणार असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

Mumbai local train
Pune Train Cancel: पुण्याहून सुटणाऱ्या ८ ट्रेन रद्द, एकही लोकल धावणार नाही, प्रवाशांना फटका

हार्बर मार्गावरही वाढवल्या होत्या एसी सेवा

यापूर्वी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर 14 नव्या एसी लोकल सेवा सुरू केल्या होत्या. आता त्यानंतर मुख्य मार्गावरही एसी लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा अधिक आधुनिक करण्याच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक भाग असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलंय. टप्प्याटप्प्याने एसी लोकलची संख्या वाढवून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

काही प्रवाशांकडून नाराजी

दुसरीकडे, सध्या धावणाऱ्या काही नॉन-एसी लोकल बंद करून त्यांच्या जागी एसी लोकल सुरू करण्याच्या निर्णयावर काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलीये. अनेकांना यामुळे सामान्य लोकल सेवांची संख्या कमी होईल, अशी चिंता आहे.

Mumbai local train
Pune Train : पुण्याहून नागपूरला जायचं टेन्शन संपलं, समर स्पेशल ट्रेन झाली सुरू; वाचा कुठे थांबणार?

प्रवाशांची संख्या वाढतेय, पण काही प्रश्न कायम

सध्या मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बर मार्ग या दोन्ही ठिकाणी एसी लोकल सुरु आहेत. या सेवांना प्रवाशांचा प्रतिसादही हळूहळू वाढतोय. मात्र, एसी लोकलचं भाडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं असावं आणि सेवा वेळेवर मिळाव्यात, अशा मागण्या काही प्रवाशांकडून सातत्याने केल्या जातायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com