Hariyana Crime Saam Tv
देश विदेश

Shocking: अश्लिल व्हिडिओ पाहून ठेवायचा शरीरसंबंध, बायकोची सटकली; प्रायव्हेट पार्ट दाबून नवऱ्याला संपवलं

Hariyana Crime: हरियाणामध्ये बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवले. अश्लिल व्हिडिओ पाहून नवरा बायकोसोबत शरीरसंबंध ठेवायचा. याच त्रासाला कंटाळून तिने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट दाबून त्याला जागीच संपवलं.

Priya More

Summary -

  • हरियाणातील सोनीपतमध्ये धक्कादायक हत्या प्रकरण समोर

  • पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं

  • पोलिसांनी दोन्ही आरोपींना केली अटक

हरियाणाच्या सोनीपतमध्ये बायकोने नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गांज्याचे सेवन करून आणि पॉर्न फिल्म पाहून नवरा बायकोसोबत शरीरसंबंध ठेवायचा आणि तिला सतत मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून महिलेने नवऱ्याची हत्या केली. नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट दाबून तिने त्याची हत्या केली. महिलेने नवऱ्याची ज्या पद्धतीने हत्या केली हे ऐकून पोलिस देखील चक्रावले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना सोनीपत येथील मॅरिज गार्डनमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना हत्या झालेल्या व्यक्तीच्या बायकोवर संशय आला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. तिने ज्या पद्धतीने नवऱ्याची हत्या केली हे ऐकून पोलिसही हादरले. पोलिसांनी या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली.

आरोपी महिलेचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. तिचा नवरा तिच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठा होता. वयामध्ये जास्त अंतर असल्यामुळे या महिलेचा नवरा नात्याबाबत सतत चिंतेत असायचा. तो या महिलेला दुसऱ्या पुरूषासोबत बोलून देत नव्हता. तो संशय घेत नेहमी तिला मारहाण करायचा. रात्रीच्या वेळी गांज्याचे सेवन करून आणि पॉर्न व्हिडीओ पाहून तो बायकोला तशाच प्रकारे शरीरसंबंध ठेवायला जबरदस्ती करायचा. या त्रासाला महिला कंटाळली होती.

६ डिसेंबरच्या रात्री असंच घडलं. महिलेचा नवरा दारू पिऊन आला. दारीच्या नशेत तो बायकोसोबत शरीरसंबंध ठेवत होता. यावेळी तो तिला मारहाण देखील करत होता. याच त्रासाला कंटाळून महिलेने तिच्या प्रियकरासोबत नवऱ्याला संपवण्याचा कट रचला. नवरा दारूच्या नशेत घरी झोपला होता. त्यावेळी महिलेने तिच्या प्रियकराला घरी बोलावले. महिलेच्या प्रियकराने तिच्या नवऱ्याचे तोंड दाबले तर महिलेने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट दाबून त्याला संपवले. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colombia Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT