Couple Tragedy : बायको ५ महिन्यांची प्रेग्नेंट, नवरा हनिमूनला घेऊन गेला, रोमान्स करताना रक्तस्त्राव झाला अन्...

Pregnant Malaysian Couple Tragedy : एका मलेशियन जोडप्याने प्रेग्नेंट असतानाही हनिमूनचा प्लॅन केला. या दरम्यान रक्तस्त्राव होऊन महिलेने मुलीला जन्म दिला. २२ आठवड्यांपूर्वी मुलीचा जन्म झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे.
Couple Tragedy : बायको ५ महिन्यांची प्रेग्नेंट, नवरा हनिमूनला घेऊन गेला, रोमान्स करताना रक्तस्त्राव झाला अन्...
Pregnant Malaysian Couple TragedySaam Tv
Published On
Summary
  • ५ महिन्यांची गर्भवती असताना जपान हनिमूनला गेलेल्या जोडप्याला आपत्कालीन प्रसूती

  • मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु

  • वैद्यकीय खर्च ३ कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज

  • मार्च २०२६ पर्यंत मायदेशी परतणं शक्य नाही

महिलेच्या बाळंतपणात डॉक्टर वारंवार काळजी घेण्याच्या सूचना देतात. मात्र तरीही निष्काळजीपणा केला तर तो बाळाच्या आणि आईच्या जीवावर बेतू शकतो. अशीच एक घटना मलेशियन जोडप्यासोबत घडली आहे. पोटात पाच महिन्यांचं बाळ असताना हनिमूनला जाणं जोडप्याला महागात पडलं आहे. या हनिमून दरम्यान बाळाची प्रसूती ९ महिन्यांआधी झाल्याने बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, बुकिट मेर्टाजम येथील लियांग ची लियांग (३२) आणि त्यांची पत्नी चान लुएन चियांग (२९) हे दोघेही मूळचे मलेशियाचे आहेत. बऱ्याच वर्षानंतर या जोडप्याला गोड बातमी मिळाली. तसेच ते परदेशी हनिमूनला जाण्यासाठी दीर्घकाळापासून पैशांची बचत करत होते. चान पाच महिन्यांची गरोदर असताना ती आणि तिच्या जोडीदाराने जपानला जायचा प्लॅन केला.

Couple Tragedy : बायको ५ महिन्यांची प्रेग्नेंट, नवरा हनिमूनला घेऊन गेला, रोमान्स करताना रक्तस्त्राव झाला अन्...
Earthquake Alert : भल्या पहाटे आसाम भूकंपाने हादरले, मध्यरा‍त्री नागरिक घराबाहेर पळाले, वाचा किती रिश्टर स्केलची तीव्रता

त्यांनी हनिमूनला जाण्यासाठी आगाऊ विमान आणि हॉटेल बुक केले होते. जपानमध्ये गेल्यावर हनीमूनच्या दरम्यान रोमान्स सुरु असताना चानला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोचण्यापूर्वीच चानच्या पोटी एका गोंडस मुलीने जन्म घेतला. परंतु या बाळाचा जन्म २२ आठवड्या पूर्वी झाल्याने त्याची प्रकृती अधिक नाजूक होती.

Couple Tragedy : बायको ५ महिन्यांची प्रेग्नेंट, नवरा हनिमूनला घेऊन गेला, रोमान्स करताना रक्तस्त्राव झाला अन्...
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे भगव्याआड लपलेला सैतान, शिंदेंसेनाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं, ठाकरेंच्या आमदाराचं वक्तव्य

जन्माच्या वेळी बाळाचे वजन फक्त ४८० ग्रॅम होते. ही घटना डिसेंबरमध्ये घडली असून बाळ अजूनही आयसीयूमध्ये अतिदक्षता विभागात आहे. जपानी रुग्णालयात तिची प्रकृती अजूनही गंभीर आहे. ती खूपच लहान आणि कमकुवत असल्याने, मार्च २०२६ पर्यंत या जोडप्याला मलेशियाला परतणे शक्य नाही. वैद्यकीय खर्च अंदाजे ३ कोटी रुपये पर्यंत पोहोचू शकतो. कुटुंबाने सोशल मीडियावर मदत मागितली असून नेटकऱ्यांनी ३ दिवसांत या जोडप्याला मदत केली आहे. मलेशियन जोडप्याने आधीच डॉक्टरांचा सल्ला घेतला नव्हता, ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com