Earthquake Alert : भल्या पहाटे आसाम भूकंपाने हादरले, मध्यरा‍त्री नागरिक घराबाहेर पळाले, वाचा किती रिश्टर स्केलची तीव्रता

Assam Morigaon Earthquake : आसाम मधील मोरीगाव जिल्ह्यात आज पहाटे ५.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार केंद्र ५० किमी खोलीवर होते. जीवित आणि वित्त हानी नाही. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
Earthquake Alert : Earthquake : भल्या पहाटे आसाम भूकंपाने हादरले, मध्यरा‍त्री नागरिक घराबाहेर पळाले, वाचा किती रिश्टर स्केलची तीव्रता
Assam Morigaon EarthquakeSaam Tv
Published On
Summary
  • आसाम मधील मोरीगाव येथे आज पहाटे ५.१ तीव्रतेचा भूकंप

  • केंद्र ५० किमी खोल, NCS कडून निर्देशांक जाहीर

  • कोणतीही जीवित किंवा वित्त हानी नाही

  • नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

आसाम मधून मोठी बातमी समोर आली आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले असून या भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. रिश्टर स्केलवर हे धक्के ५.१ इतके होते. दरम्यान भूकंपाच्या धक्क्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आज दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी सोमवारी पहाटे आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर हे धक्के ५.१ इतके होते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (एनसीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र २६.३७ उत्तर अक्षांश आणि ९२.२९ पूर्व रेखांशावर ५० किलोमीटर खोलीवर होते.

Earthquake Alert : Earthquake : भल्या पहाटे आसाम भूकंपाने हादरले, मध्यरा‍त्री नागरिक घराबाहेर पळाले, वाचा किती रिश्टर स्केलची तीव्रता
Nanded : जिल्हा परिषदेच्या जेवणात आळ्या, मुलांनी कडिपत्त्यासारख्या काढल्या अन्... नांदेडच्या शाळेतील धक्कादायक प्रकार; VIDEO व्हायरल

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही, जरी मध्य आसामच्या काही भागातील रहिवाशांना सौम्य ते मध्यम भूकंपाचे धक्के जाणवले. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आसाममध्ये भूकंप झाला तेव्हा लोक त्यांच्या घरात झोपले होते.

Earthquake Alert : Earthquake : भल्या पहाटे आसाम भूकंपाने हादरले, मध्यरा‍त्री नागरिक घराबाहेर पळाले, वाचा किती रिश्टर स्केलची तीव्रता
Shocking : कामावर गेला तो परतलाच नाही, लोणावळ्यात ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह, लायन्स पॉईंटवर नेमकं काय घडलं?

अनेकांना झोपेत थरथर जाणवली आणि ते घाबरून घराबाहेर पडले. कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नसले तरी, लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आसामसह, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, हे धक्के खूपच सौम्य होते आणि लोकांना ते फारसे जाणवले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com