Mukhyamantri Mahila Rozgar Yojana Google
देश विदेश

Government Scheme: 'या' राज्यातील लाडकींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यात जमा होणार १०,००० रुपये

Mukhyamantri Mahila Rozgar Yojana: बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सरकार पुन्हा आले. आज नितीश कुमार यांनी १० व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बिहारमधील लाडक्या बहिणीच्या खात्यात १० हजार रुपये जमा होणार आहेत.

Priya More

Summary -

  • बिहारमध्ये २१ नोव्हेंबर रोजी महिलांच्या खात्यात १०,००० रुपये जमा होणार आहेत

  • मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा हा नववा हप्ता असणार आहे

  • आठ हप्त्याचे पैसे आतापर्यंत देण्यात आले आहेत

  • १.५ कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आले आहे. आज नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर नितीश कुमार अनेक योजनांना हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या लाभार्थींसाठी आनंदाची बातमी आहे. शपथविधी सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी बिहारमधील महिलांच्या खात्यात १० हजार रुपये जमा होणार आहेत.

२१ नोव्हेंबरला बिहारमधील महिलांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. बिहार निवडणुकीत गेम-चेंजर मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा पुढील हप्ता २१ नोव्हेंबर रोजी हस्तांतरित होणार आहे. या योजनेचे आठ हप्ते आधीच देण्यात आले आहेत. आता नववा हप्ता देण्यात येणार आहे. निवडणुकीदरम्यान बिहार प्रशासनाने स्पष्ट केले होते की महिला रोजगार योजना सुरू राहील आणि ज्या महिलांना निधी मिळाला नाही त्यांना तो नियोजित तारखांना मिळेल.

आता बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आल्यामुळे ही योजना सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिहार सरकारने निवडणुकीपू्र्वीच मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत पैसे देण्याच्या तारखेची घोषणा केली होती. १.५ कोटींपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. महिला रोजगार योजनेचा फॉर्म भरलेल्या आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या सर्व महिलांच्या खात्यात सरकार आलटून पालटून पैसे पाठवत आहे. २१ नोव्हेंबर रोजी या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहेत. जर तुमच्या खात्यात १० हजार रुपये अजूनही आले नसतील तर ते उद्या येऊ शकतात. तुम्ही ज्याठिकाणी फॉर्म भरला होता त्याठिकाणी जाऊन चेक करू शकता.

बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सरकार आल्यामुळे पुन्हा १.५ कोटींहून अधिक महिलांना आता २ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. योजनेची घोषणा करताना बिहार सरकारने सांगितले की, १८ प्रकारचे रोजगार सुरू करण्यासाठी १०,००० रुपयांचा प्रारंभिक हप्ता दिला जाईल. यानंतर यशस्वीरित्या व्यवसाय करणाऱ्या महिला सहा महिन्यांनंतर २ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी अर्ज करू शकतात. या योजनेमुळे बिहारमध्ये पुन्हा आपले सरकार आणण्यात नितीश कुमारांना यश आले आहे. एनडीएच्या विजयामध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा सर्वात मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई

Sri Lanka vs Australia T20 WC: श्रीलंकेच्या धुरंधरांनी कांगारूंना रडवलं; वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियानं गाशा गुंडाळला

Panipuri: तुमच्या पाणीपुरीत चक्क जिवंत उंदीर, फूड ब्लॉगरच्या VIDEO ने खळबळ

अल्पसंख्याक शाळांचा घोटाळा; राज्यातील 95 टक्के अल्पसंख्याक शाळा बोगस',घोटाळ्याचा 'गॉडफादर' कोण?

Holi Special Train: शिमग्यानिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, होळी विशेष गाड्या धावणार; ट्रेनची लिस्ट वाचून आताच करा बुकिंग

SCROLL FOR NEXT