हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एकाच कुटुंबातील तीन लोकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये नवरा- बायको आणि त्यांच्या 5 वर्षांचा मुलाची मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना फरीदाबाद येथील सरूरपूरमध्ये घडली आहे. घरामध्ये तिघांचा मृत्यू आढळून आला. हे सर्वजण सोबत झोपले होते आणि सकाळी तिघेही मृत अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. पोलिसांनी सांगितले की घरामध्ये शेकोटी पेटवल्याचे आढळून आले आहे. मात्र मृत्यूचे कारण पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यावरच कळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील चार सदस्य हे एकाच घरात राहत होते. यामध्ये मृत्यू झालेल्या रमेश त्याची बायको ममता आणि 5 वर्षाचा त्यांचा मुलगा सोबत रमेशचा भाऊ देखील राहायचा. रमेश त्याची बायको आणि भाऊ हे सगळे मजदूर होते. 2 महीने आधीच त्यांनी भाड्याने घर घेतले होते. हे कुटुंब बिहारमधून कामाच्या शोधात फरीदाबादला आले होते. घर मालक परशुरामने दिलेल्या माहितीनुसार, रमेशच्या भावाने सकाळी फोन करून घर मालकाला माहिती दिली की भाऊ आणि वाहिनी उठत नाहीये आणि पुतण्या देखील कुठलाही प्रतिसाद देत नाहीये. तुम्ही लवकर घरी या असे म्हणत तो रडू लागला. घर मालक घरी जाताच हे सगळे मृत अवस्थेत आढळून आले.
परशुरामच्या म्हणण्यानुसार रमेशच्या भावाने सांगितले की, काल वहिनींनी काल रात्री हलवा बनवला होता आणि तो सगळ्यांनी एकदम आवडीने खाल्ला. मात्र, सकाळी 5 वाजता नेहमीप्रमाणे मी भाऊ आणि वहिनीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही मग मी पुन्हा तो हलवा खाल्ला आणि पुन्हा झोपून घेतले. परशुरामच्यानुसार रमेशच्या नाक आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता आणि वहिनी आणि मुलाच्या तोंडातून फेस येत होता या सगळ्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या गंभीर घटनेचा पोलीस आता अधिक तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.