Train Accident: धावत्या ट्रेनवर क्रेन कोसळली, डबे रुळावरून घसरून लागली आग; २२ प्रवाशांचा मृत्यू

Thailand Train Accident: थायलंडच्या बँकॉकमध्ये भयंकर रेल्वे अपघात झाला. धावत्या ट्रेनवर क्रेन कोसळली. यामुळे ट्रेनचे डबे रूळावरून घसरले. या अपघातामध्ये २२ जणांचा मृत्यू आणि ७९ जण जखमी झालेत.
Train Accident: धावत्या ट्रेनवर क्रेन कोसळलं, डबे रुळावरून घसरून लागली आग; २२ प्रवाशांचा मृत्यू
Train AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • थायलंडमध्ये धावत्या ट्रेनवर क्रेन कोसळून भीषण अपघात

  • ट्रेन रुळावरून घसरून काही डब्यांना आग लागली

  • या अपघातामध्ये २२ प्रवाशांचा मृत्यू तर ७९ जण जखमी झाले

  • हाय-स्पीड ट्रेन लाईनच्या बांधकामादरम्यान ही दुर्घटना घडली

थायलंडमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला. धावत्या ट्रेनवर क्रेन कोसळली त्यामुळे ट्रेन रूळावरून घसरली. या भीषण रेल्वे अपघातामध्ये २२ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ७९ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. थायलंडच्या बँकॉकमध्ये हा रेल्वे अपघात झाला. ही ट्रेन थायलंडची राजधानीवरून देशाच्या ईशान्य भागात जात होती.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी ९ वाजता बँकॉकच्या ईशान्येला २३० किमी अंतरावर असलेल्या रत्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात हा अपघात झाला. रेल्वे अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्माचारी, स्थानिक पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणी एलिव्हेटेड हाय-स्पीड ट्रेन लाईनचे बांधकाम सुरू होते. बँकॉकवरून ट्रेन येताचहाय-स्पीड ट्रेन लाईनच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली क्रेन थेट त्यावर पडली. क्रेन पडल्याने ट्रेन रुळावरून घसरली. या अपघातानंतर ट्रेनच्या काही डब्यांना आग लागली. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथक अपघातग्रस्त ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

थायलंड पोलिसांनी सांगितले की, या अपघातामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ७९ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. थायलंड रेल्वेने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेनमध्ये १९५ जण प्रवास करत होते. ही संख्या बसण्याच्या नियोजनावर आधारित आहे. खरी संख्या वेगळी असू शकते. थायलंडचे उपपंतप्रधान आणि वाहतूक मंत्री पिपट रत्चाकिप्रकर्ण यांनी अपघाताच्या कारणाची संपूर्ण माहिती घेण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com