Dog Killing Case : निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ

Telangana Village Dog Killing Case : तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जवळपास ५०० कुत्र्यांना ठार करण्यात आले आहे. विषारी इंजेक्शन देऊन ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी उमेदवार आणि सरपंचांनी हे कृत्य केल्याचा दावा करण्यात येत आहे.
Telangana 500 Dog Killing Case
Telangana 500 Dog Killing Casesaam tv
Published On

निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी कुत्र्यांची निर्दयीपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. काही गावांतील सरपंचांनी निवडणुकीत गावकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याच्या नादात एका आठवड्यात जवळपास ५०० कुत्र्यांना ठार मारलं आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये खळबळ उडाली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, मागील आठवडाभरात अनेक गावांमध्ये ५०० कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राणीमित्र अडुलापुरम गौतम यांनी १२ जानेवारीला तक्रार दाखल केली आहे. त्यात हा गंभीर आरोप केला आहे. कामारेड्डी जिल्ह्यातील भवानीपेठ, पालवंचा, फरीदपेट, वाडी आणि बंदारमेश्वरपल्लीसह अनेक गावांमधील भटक्या कुत्र्यांना कट रचून ठार मारल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतच जवळपास २०० भटक्या कुत्र्यांना ठार मारलं आहे, असा दावाही त्यांनी केला.

सरपंचांनी कुत्र्यांना ठार मारलं

तक्रारीनुसार, गौतम यांना १२ जानेवारीला दुपारी साधारण तीनच्या सुमारास कुत्र्यांची सामूहिक हत्या केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. गावच्या सरपंचाच्या सांगण्यावरून कुत्र्यांना ठार मारले आहे, असा आरोपही गौतम यांनी केला. कुत्र्यांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणात सामील असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कुत्र्यांना विषारी इंजेक्शन

पोलिसांच्या माहितीनुसार, पाच गावांतील सरपंच, किशोर पांडे या व्यक्तीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन दिले गेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे. कुत्र्यांना ठार मारल्यानंतर त्यांचे मृतदेह गावाच्या बाहेर पुरण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने शवविच्छेदनासाठी पुरलेले कुत्र्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Telangana 500 Dog Killing Case
Navi Mumbai Election : मतदानाच्या काही तास आधीच नेरूळमध्ये अडीच लाखांची रोकड पकडली; मतदार यादी झेरॉक्स, कागदपत्रे जप्त

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही उमेदवारांनी अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निवडणुकांआधी काही उमेदवारांनी हे आश्वासन दिले होते. भटके कुत्रे आणि माकडांचा बंदोबस्त करू, असे उमेदवारांनी सांगितले होते. आता भटक्या कुत्र्यांना ठार मारून हे आश्वासन पूर्ण केले जात आहे, असा दावाही गावकऱ्यांनी केला आहे.

Telangana 500 Dog Killing Case
मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाट्टेल ते... चांदीच्या वाट्या वाटल्या, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com