Navi Mumbai Election : मतदानाच्या काही तास आधीच नेरूळमध्ये अडीच लाखांची रोकड पकडली; मतदार यादी झेरॉक्स, कागदपत्रे जप्त

navi mumbai polls cash and voter list seized in nerul : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, काही तास शिल्लक असतानाच नेरूळमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. पैसे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीकडून अडीच लाखांची रोकड आणि मतदारयादीची झेरॉक्स जप्त करण्यात आली आहे.
election flying squad action in nerul navi mumbai
election flying squad action in nerul navi mumbaisaam tv
Published On

विकास मिरगणे, नवी मुंबई, साम टीव्ही

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी १५ तारखेला मतदान होणार आहे. आज, मंगळवारी संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार आहे. संध्याकाळपासून छुपा प्रचार सुरू होईल. दुसरीकडं, आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू असतानाच नवी मुंबई महापालिका हद्दीत एका व्यक्तीकडून अडीच लाखांची रोकड पकडली आहे. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीकडे मतदार यादीची झेरॉक्स, काही कागदपत्रे असल्याची माहिती आहे. ती जप्त करण्यात आली असून, संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्याचवेळी नेरूळ परिसरात पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. एका व्यक्तीकडून अडीच लाख रूपये, मतदार यादीची झेरॉक्सही जप्त करण्यात आली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेतले आहे.

नेरुळमधील एका भागात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक निरीक्षण पथक आणि स्थानिक पोलिसांनी धाड टाकली. तपास केला असता संबंधित व्यक्तीकडून अडीच लाखांची रोकड, तसेच मतदारांची छायांकित यादी, काही कागदपत्रे आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आले. ही रक्कम मतदारांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणार होती का? याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

election flying squad action in nerul navi mumbai
Zilla Parishad Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडाला; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल कधी? वाचा वेळापत्रक

या प्रकरणाची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक कायद्यांतर्गत पुढील कारवाई केली जाणार आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून रोकड कुणी दिली, कुठून आली? मतदार यादी जवळ बाळगण्याचा हेतू आणि संभाव्य राजकीय संबंध याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

election flying squad action in nerul navi mumbai
ZP Election : २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात, निवडणुकीची घोषणा कधी होणार? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com