Amrit Bharat Express: महाराष्ट्रासह देशाला मिळणार ९ नवीन अमृत भारत एक्स्प्रेस; कुठून- कुठे धावणार? तिकीट किती? वाचा सविस्तर

India Will Get 9 New Amrit Bharat Express Train: देशाला आता ९ नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे. या ९ ट्रेन ९ नवीन मार्गांवरुन धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.
Amrit Bharat Express
Amrit Bharat ExpressSaam Tv
Published On
Summary

देशाला ९ नवीन अमृत भारत एक्सप्रेस धावणार

रेल्वे मंत्र्यांची घोषणा

कोणत्या मार्गावर धावणार अन् तिकीट किती?

भारतीय रेल्वेत आता ९ नवीन अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश होणार आहे. ९ वेगवेगळ्या मार्गांवर या ९ अमृत भारत एक्सप्रेसक धावणार आहेत. सरकार लवकरच अमृत भारत एक्सप्रेस लाँच करणार आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. त्यांनी ज्या ९ मार्गांवर अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे त्याबाबतही माहिती दिली आहे. या नवीन ट्रेन पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू येथून धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

Amrit Bharat Express
Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

या मार्गांवर धावणार अमृत भारत एक्सप्रेस (Amrit Bharat Express Train Route)

गुवाहाटी (कामाख्या)- रोहतक भारत एक्सप्रेस

डिब्रुगड-लखनऊ (गोमती नगर)

न्यू जलपाईगुडी-नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस

न्यू जलपाईगुडी- तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस

अलीपुरद्वारे-एसएमवीटी बंगळुरु अमृत भारत एक्सप्रेस

अलीपुरद्वार-मुंबई अमृत भारत एक्सप्रेस

कोलकत्ता-ताम्बरम अमृत भारत एक्सप्रेस

कोलकत्ता हावडा- आनंद विहार टर्मिनल ट्रेन

कोलकत्ता (सियालदह)- बनासर अमृत भारत एक्सप्रेस

अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचं तिकीट किती? (Amrit Bharat Express Ticket Price)

अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा नॉन एसी स्लीपर कोच लांब पल्ल्यासठी डिझाइन केले आहे. या ट्रेनचे तिकीटे १००० किलोमीटरसाठी २०० रुपये आहेत. दरम्यान, तुम्ही किती लांब प्रवास करता त्यावर ते भाडे बदलते. २०२३ पासून राज्यात अमृत भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत. आतापर्यंत ३० ट्रेन चालवल्या जात आहेत. यानंतर आता आठवड्याभरात अजून ९ ट्रेन सुरु केल्या जाणार आहे. यामुळे देशात ३९ अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहेत.

Amrit Bharat Express
Amrit Bharat Express : देशात ४ नवीन अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन धावणार, कुठे-कुठे थांबणार? तिकीट किती? वाचा संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com