

वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सेवेत येणार
१८० किमी प्रतितास वेगाने यशस्वी स्पीड ट्रायल
सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास स्थिर
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला व्हिडिओ
वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सेवा सुरू होणार. वंदे भारत ट्रेन अनेक राज्यात धावतेय. वंदे भारत ट्रेनमुळे प्रवास अती जलद झालाय. आता या वंदे ट्रेनची नवी आवृत्ती स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकर धावणार आहे. या ट्रेनचा प्रवास सर्वात आरामदायी आणि सुखकर होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी वंदे भारत स्लीपर ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल केलाय. त्यांनी ट्रेनच्या स्पीड ट्रायल घेतली आहे. यात ट्रेन सुसाट १८० च्या स्पीडनं रुळावर धावतेय, त्या सुसाट वेगात सीटवर ठेवलेला पाण्याचा ग्लास थोडा सुद्धा हालत नाहीये.
मंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ हा कोटा-नागदा दरम्यानच्या प्रवासाचा आहे. यात ही नवीन ट्रेन १८० किमी प्रतितास वेगाने धावताना दिसते. ट्रेन १८० किमी प्रतितासाच्या वेगाने धावते. तरीही पाण्याचा ग्लासामधून एक थेंबही सांडले नाही. त्यामुळे ट्रेनचा स्पीड सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. “वंदे भारत स्लीपरची आज आयुक्त रेल्वे सुरक्षा यांनी चाचणी केली. यादरम्यान ट्रेनची गती तपासण्यात आली. ही चाचणी कोटा नागदा विभागादरम्यान घेण्यात आली. या प्रवासा ट्रेन ताशी १८० किमी वेगाने धावली होती. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चाचणी दरम्यानचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केलाय.
वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी सुरू होणार आहेत. नावावरून तुम्ही समजला असाल की ही ट्रेन सध्या भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये सेवेत असलेल्या वंदे भारत चेअर कार ट्रेनची अपग्रेड आवृत्ती आहे. यात प्रवाशांना स्लीपर कोच दिला जाणार आहे. दरम्यान वातानुकूलित वंदे भारत स्लीपर ट्रेनचे दोन प्रोटोटाइप रॅक बीईएमएलने तयार केले आहेत आणि सध्या ते चाचणी टप्प्यात आहेत.
भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात मोठ्या प्रमाणात बदल करणार आहे. पुढील काही वर्षांत २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन्स सुरू करण्याची योजना सरकारची आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) च्या सहकार्याने BEML १० स्लीपर ट्रेन सेट तयार करण्यात येत आहे. भारतीय आणि रशियन भागीदारांचा संयुक्त उपक्रम असलेल्या किनेट द्वारे आणखी १० सेट विकसित केले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.