

भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या तिकीट दरात वाढ
शताब्दी, वंदे भारत, गतिमान एक्सप्रेसच्या तिकीट दरात वाढ
भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे. भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असतो. याचसोबत आता एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि प्रिमियम ट्रेन आहेत. यामधून प्रवास एकदम सुसाट होतो. यामध्ये राजधानी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस,शताब्दी एक्सप्रेस,तेजस एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस आणि वंदे भारतचा समावेश आहे. या ट्रेनने प्रवास खूप जलद आणि सुखकर होतो.
शताब्दी, तेजस, गतिमान, वंदे भारत ट्रेनमध्ये तुम्हाला चेअर कार कोचने प्रवास करायला मिळेल. तर राजधानी आणि दुरांतो या ट्रेन लांब पल्ल्यासाठी असतात. त्यामुळे या ट्रेनमध्ये स्लीपर, एसी क्लास असतात. या ट्रेनने प्रवास एकदम आरामदायी होतो.दरम्यान, आता या ट्रेनच्या तिकीट दरात वाढ झाली आहे.
रेल्वे तिकीट दरात वाढ (Railway Ticket Fare Hike)
रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. २६ डिसेंबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. यामध्ये २१५ किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या ट्रेन तिकीटमध्ये प्रति किलोमीटरमागे १ पैशांनी वाढ केली आहे. तर ५०० किलोमीटर प्रवासासाठी तुम्हाली १० रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहे.दरम्यान, आत कोणत्या ट्रेनचे तिकीट दर किती झाले आहेत ते जाणून घ्या.
ट्रेन तिकीटाचे दर (Railway Ticket Fare Price)
शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express)
शताब्दी एक्सप्रेससाठी ५० किलोमीटरपर्यंतच्या ट्रेनचे तिकीट १७२ रुपये आहेत. तर १०० किलोमीटरच्या प्रवासासाठी २१९ रुपये, २०० किलोमीटरसाठी ३४२ रुपये तर ३०० किलोमीटरसाठी ४५८ रुपये तिकीट असणार आहे.
तेजस एक्सप्रेस (Tejas Express)
तेजस एक्सप्रेसच्या ५० किलोमीटरच्या प्रवासासाठी तिकीट २०८ रुपये आहे. १०० किलोमीटरसाठी २६२ रुपयांचे तिकीट आहे. २०० किलोमीटरसाठी ४१० रुपयांचे तिकीट आहे. ३०० किलोमीटरसाठी ५४७ रुपये तिकीट असणार आहे.
वंदे भारतचे ट्रेन तिकीट (Vande Bharat)
वंदे भारतच्या ५० किलोमीटरसाठी ट्रेन तिकीट २४३ रुपये आहेत. १०० किलोमीटरसाठी तिकीटाची किंमत ३०५ रुपये आहे. २०० किलोमीटरसाठी तिकीटाची किंमत ४७७ रुपये आहे तर ३०० किलोमीटरसाठी तिकीटाचे दर ६५९ रुपये आहे.
गतिमान एक्सप्रेस (Gatiman Express Ticket Rate)
या ट्रेनसाठी ५० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी ट्रेनचे तिकीट २५१ रुपये आहे. १०० किमीसाठी ३१६ रुपये तर २०० किमीच्या प्रवासासाठी ४९४ रुपये तिकीट आहे. ३०० किलोमीटरसाठी ट्रेमने तिकीट ६५९ रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.