Maharashtra Corporation Election: मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या पोरांना तिकीट नकोच; ऐननिवडणुकीत भाजपचा निर्णय

BJP Big Decision For Maharashtra Corporation Election : महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने मोठा निर्णय घेतलाय. आमदार आणि खासदारांच्या मुलांना आणि पती-पत्नींना तिकीट नाकरण्यात येत आहे. याचा उद्देश घराणेशाहीच्या राजकारणाला आळा घालणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणे असल्याचं म्हटलं जात आहे.
BJP Big Decision For Maharashtra Corporation Election
BJP leaders during a party meeting where the new municipal election ticket policy was discussed.Saam tv
Published On
Summary
  • महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा नवा पॅटर्न

  • आमदार-खासदारांच्या मुलांना आणि पत्नीला तिकीट नाही

  • कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भाजपचा भर

महापालिका निवडणुकांमध्ये भाजपनं नवा पॅटर्न सुरू केलाय. कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून महापालिकांच्या निवडणुकीत आमदार-खासदारांच्या मुलांना किंवा पत्नीला उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. हा निर्णय भाजप नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान भाजपकडून आज महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जातेय. मात्र या यादीत आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले नाहीये.

ज्या प्रभागातून आमदार-खासदारांच्या मुलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होते, तिथून त्यांना माघार घेण्यास सांगण्यात आलंय. नाशिकमध्ये दोन्ही महिला आमदारांच्या मुलांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेत. नाशिकमधील आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या मुलांचे अर्ज माघारी घेतले आहेत. तर खासदार धनंजय महाडिक यांच्या पोरानेही उमेदवारी अर्ज भरला होता, त्यांनी देखील अर्ज मागे घेतला आहे.

BJP Big Decision For Maharashtra Corporation Election
Solapur News: दत्तात्रय भरणे मामा तुमची गेम करायला बसलेत! हत्येचा कट रचला जातोय, ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

कृष्णराज महाडिक यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु राज्य पातळीवर नेत्यांच्या घरात उमेदवारी न देण्याचा निर्णय झाल्याने कृष्णराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही पक्षाचे आदेश मानणारे कार्यकर्ते असल्याचं धनंजय महाडिक या निर्यणाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले.

BJP Big Decision For Maharashtra Corporation Election
Muncipal Election : कोल्हापुरात महायुती, पण सांगलीत एका कारणानं फिस्कटलं, शिंदेसेनेचा थेट भाजपला इशारा

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलानेही नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आमदार फरांदे यांनी भाजप पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयाचे स्वागत केलंय. पक्षाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार, अशी प्रतिक्रियाफरांदे यांनी दिली. आमदार सीमा हिरे यांची मुलगीही नाशिक पालिका निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलीय.

महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजांची संख्या आहे. त्यासंदर्भात बोलतना धनजंय महाडिक म्हणाले, आम्ही नाराज उमेदवारांना दोन दिवसात समजावून सांगू. महायुतीची सांगडं घालताना अनेकांवर अन्याय झाला हे मान्य मात्र त्यांची समजूत काढू, असं खासदार धनजंय महाडिक म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com