

रेल्वेचा प्रवाशांना सुखद धक्का
पंतप्रधन मोदी ४ नव्या अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार
बिहारच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार
भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवाशांना आणखी सुखद धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच महिन्यात ४ नव्या अमृत भारत ट्रेनच्या हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ४ ट्रेन पश्चिम बंगालहून उत्तर प्रदेश व्हाया दिल्लीमार्गे धावणार आहेत. या ट्रेनमुळे बिहारमधील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
रेल्वेच्या निर्णयामुळे बिहारच्या अमृत भारत ट्रेनची संख्या १३ वरून १८ पर्यंत होणार आहे. 'अमृता भारत' ट्रेनमुळे कमी वेळेत सुकर प्रवास होतो. या ट्रेनमध्ये मॉडर्न इंटीरिअर, चार्जिंग पॉइंट्स आणि सुरक्षेचे फिचर्स देण्यात आले आहेत.
४ अमृत भारतचे मार्ग काय आहेत?
डिब्रुगढ-गाोमती नगर (लखनौ) अमृत भारत : साप्ताहिक ट्रेन आसाम ते लखनौदरम्यान धावणार आहे. बिहारमधून ही ट्रेन किशनगंज, कटिहार, नवगछिया, खगडिया, बेगूसराय, बरौनी, हाजीपूर, छपरा आणि सीवान सारख्या प्रमुख स्टेशनवर थांबणार आहे. या ट्रेनमुळे मिथिला आणि सीमालगत भागातील लोकांना फायदा होणार आहे.
बनारस-सियालदह अमृत भारत : ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. बनारसहून ही ट्रेन रविवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी धावेल. तर सियालदह येथून सोमवार,बुधवार आणि शनिवारी धावणार आहे. या ट्रेनमुळे बिहारची राजधानी पटनाच्या प्रवाशांना थेट पश्चिम बंगालला जाण्याची संधी मिळाली. तसेच त्यांना वाराणसीला जाण्यासही पर्याय उपलब्ध होणार आहे.
हावडा-आनंद विहार अमृत भारत : दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ही ट्रेन भभुआ रोड, सासाराम, डेहरी ऑन सोन, अनुग्रह नारायण रोड आणि गयामध्ये थांबणार आहे. दक्षिण बिहारच्या जिल्ह्यांना थेट दिल्लीला जलद गतीने जोडण्यास ही ट्रेन महत्वाची भूमिका निभावणार आहे.
पनवेल ते अलीपूरद्वार अमृत भारत : मुंबईहून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा या ट्रेनमुळे मिळणार आहे. पनवेलहून सोमवार आणि अलीपूरद्वारमधून गुरूवारी धावणार आहे. बिहारमधून ही ट्रेन बक्सर, आरा, दानापूर, पाटलिपुत्र, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, खगडिया आणि कटिहार सारख्या स्टेशनवर थांबणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.