

३६ वा वाढदिवस साजरा करण्याच्या आधीच तिवारींचा मृतदेह आढळला
अतिथी गृहाच्या बाहेर रस्त्यावर आढळला मृतदेह
मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबांवर कोसळलेला दु:खाचा डोंगर
IAS Anurag Tiwari: उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये १७ मे रोजी २०१७ रोजी आयएएस अधिकारी अनुराग तिवारी यांचं कुटुंब ३६ वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करत होते. त्याचवेळी त्यांचा घरी फोन आला. अनुराग तिवारी यांचा मृतदेह सरकारी अतिथी गृहाच्या बाहेर रस्त्यावर आढळल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. अनुराग यांच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
अनुराग तिवारी यांचा जन्म १९८१ साली बहराइचच्या कानूनगोपुरा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. अनुराग यांना दोन भाऊ होते. तिन्ही भावांचं इंजिनीअरिंग पूर्ण झालं होतं. त्यांनी मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी एनटीपीसीमध्ये काम केल्यानंतर अनुराग यांनी २००६ साली यूपीएससीमधून यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी परीक्षेत भारतातून २४ वा क्रमांक मिळून कर्नाटक कॅडरमध्ये सामील झाले होते.
चार वर्षांच्या सेवेत त्यांनी मधुगिरी, तूमकूर, मांड्या आणि बीदर सारख्या भागांना सेवा दिली. त्यांनी बीदरमध्ये तलावाचे पुनरुज्जवीन आणि सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिलं. अनुराग बेंगळुरूमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे आयुक्त होते. ते आणि त्यांचा भाऊ मयंक तिवारी मोठ्या घोटाळ्याची चौकशी करत होते. अनुराग हे १००० ते २००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करत होते.
मीडिया रिपोर्टनुसार, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या सॉफ्टवेअरच्या एका चुकीने एकच आधार कार्ड अनेक रेशन कार्डाशी जोडला जात होता. त्यामुळे गरीबांना मिळणारे लाभ अनधिकृतरित्या इतरत्र वळवळे जात होते. 'अन्न भाग्य' योजनेतील भ्रष्टाचार उघड करण्यापासून रोखण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप इतर आयएएस अधिकाऱ्यांनी केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.