Delhi-NCR Earthquake Saam Tv
देश विदेश

Delhi Earthquake: दिल्ली-NCR सह अख्खा उत्तर भारत भूकंपानं थरथरला; भूकंपाचा केंद्रबिंदू मात्र दुसऱ्या देशात!

Satish Kengar

Delhi-NCR Earthquake:

दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआरसह आज संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे हादरे बसले आहेत. अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती मिळत आहे. अफगाणिस्तानात आज दुपारी 2.50 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी होती.

अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात भूकंप झाला होता, ज्याचे धक्के दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवले. दिल्लीशिवाय हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. असं असलं तरी सध्या देशात कुठेही या भूकंपाच्या धक्क्यामुळे नुकसान झाल्याचं वृत्त नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नोएडा, गुरुग्राम आणि फरीदाबादच्या सोसायट्यांमधून लोक लगेचच बाहेर आले. कार्यालयांमध्येही जेवणाची वेळ होती आणि धक्के जाणवताच लोकांनी बाहेर धाव घेतली. अनेक लोकांनी सोशल मीडियावर भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. तर काहींनी आपला अनुभव शेअर केला आहे. यातच एका व्हिडिओत भूकंपाच्या हदराने घरातील सिलिंग फॅन हलताना दिसत आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. दिल्ली भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. दिल्लीतील यमुनेच्या आसपासच्या क्षेत्राबाबत शास्त्रज्ञांनी अनेकदा चिंता व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT