MLA Disqualification Result: अजिबात धाकधूक नाही, मात्र 'त्या' भेटीनं संशय वाढला; NCP च्या सुनावणीवर जयंत पाटील काय म्हणाले?

MLA Disqualification Result Update: शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीची चर्चा सुरू झाली आहे. जानेवारीतच विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
MLA Disqualification Result Update
MLA Disqualification Result UpdateSaam Digital
Published On

अक्षय बडवे

MLA Disqualification Result Update

शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीची चर्चा सुरू झाली आहे. जानेवारीतच विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. यावर जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या निकालानंतर आमची अजिबात धाकधूक वाढलेली नाही. मात्र शिवसेना निकालाआधी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या भेटीने संशय वाढल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

विधानसभा अध्यक्षांनी दिलेला शिवसेना आमदार अपात्रततेच्या निकालात कोणीही अपात्र झालेलं नाही. मात्र प्रतोद कोण योग्य हे सुप्रीम कोर्टाने याआधी ठरवलं होतं पण ते डावलून निर्णय घेण्यात आला आला आल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिल्लीतील बैठकीनंतर जागा वाटपाचा निर्णय

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ४५+ जागा निवडून आणणार म्हणत आहे. उरलेल्या आम्हाला ३ जागा सोडल्या त्याबद्दल भाजपचे धन्यवाद असा उपरोधीक टोला देखील त्यांनी लगावला आहे. नगरमध्ये आमच्या तीन पक्षात निर्णय झाला की आणि उमेदवार तयार झाला की माहिती दिली जाईल. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. दिल्लीत अजून एक बैठक होईल आणि नंतर निर्णय घेण्यात येईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MLA Disqualification Result Update
MLA Disqualification Result Update: एकनाथ शिंदे हेच आता मुख्यमंत्री राहणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

'अर्थपूर्ण' भेट

शरद पवारांवर ज्यांना बोलायचं आहे त्यांनी बोलत राहावं. पवार यांना आता लोकांचा खूप पाठिंबा मिळाला आहे. अजित पवार अर्थमंत्री आहेत,जे लोकं त्यांना भेटले त्यांना त्यांच्याकडून भरघोस निधी मिळणार असेल, त्यामुळे ही भेट "अर्थपूर्ण" भेट म्हणावी लागेल. तसंच राज्याला साखर उद्योग खूप मोठा विषय आहे. मोदींनी कांद्याची निर्यात बंदी उठवली पाहिजे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नाराज तर आहेच पण संपूर्ण राज्यात शेतकरी नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं.

MLA Disqualification Result Update
MLA Santosh Bangar Challenge: नरेंद्र मोदी पुन्हा PM झाले नाहीत तर भर चौकात आत्महत्या करेन, आमदार संतोष बांगर यांनी दिलं चॅलेंज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com