महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर विधानसभा अध्यक्षांनी कायदेशीर निकाल दिला असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेलाच मूळपक्षाची मान्यता देवून वैद्य ठरवलं आहे. त्यामुळे युती सरकार मजबूत स्थितीत आहे. युती सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचं भाष्य आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज सविस्तर प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी हक्कभंग आणण्याचा वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले. पहिल्यांदा याना कायदा कळत नाही. यांनी एकमेकांना चोर म्हणावं डाकू म्हणावं आम्हाला काहीही देणघेण नाही.यांना हे लक्षात आलंय की, यांची दुकानदारी आत संपली म्हणून हे अशी वक्तव्य करत आहेत, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उद्धव ठाकरे यांचे खासदार, आमदार निघून गेले तेव्हाच त्यांचं पक्षनेतेपद संपलं होतं. निवडून आलेल्या प्रतिनिधींना एकूण मतदान किती आहे. मतदानाच्या आधारावर पक्ष रजिस्टर होत असतो. निवडून आलेले प्रतिनिधी जर तुमच्या सोबत नसतील तर आपोआपच पक्षाचं नेतेपद जातं. सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आणि मत ज्यांच्याकडे असतं त्यांनाच पक्षनेतेपद मिळतं. एकनाथ शिंदे हे नेते आहेत. सुप्रीम कोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाविरोधात केलेली उद्धव ठाकरे यांची याचिका फेटाळली आहे. निकाल हा पारदर्शक पद्धतीने दिला आहे. राहुल नार्वेकर यांचं मी अभिनंदन करतो. मात्र हा निर्णय मान्य नसेल तर सुप्रीम कोर्टात जाण्यापासून कोणालाही कोणीही रोखलेलं नाही . उद्धव ठाकरे यांना जायचं असेल तर त्यांनी जावं, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
नियम सर्वांना सारखेच आहे आणि एकनाथ शिंदे यांना वेगळा नियम उद्धव ठाकरे यांना वेगळा नियम असे होणार नाही. निकाल हा निकाल असतो मेरिटच्या आधारावर तो निकाल दिलेला आहे. जे मेरिट सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाने दिलेले आहे त्याच आधारावर सगळ्यांचा निकाल लागेल. या निकालाचा कसलाही संबंध पुढच्या राजकारणाशी नाही. अनेक लोक यापूर्वीच एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले आहेत. जे लोक आमच्याकडे येतील त्यांच्यासाठी आमचा दुपट्टा तयार आहे, त्यांचं भाजपमध्ये स्वागत असेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.