ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
त्वचेचा रंग उजळण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींचा वापर करत असतो पण पायांकडे दुर्लक्ष केले जाते. धूळ माती बसून पायांचा काळपटपणा वाढतो.
पायांचा काळपटपणा हा हिल्स किंवा सॅंडल घालल्यावर स्पष्टपणे दिसून येतो. त्यांमुळे तुमचा पूर्ण लूक घाण दिसू लागतो.
जर तुमचे पाय देखील काळपट दिसत असतील तर या घरगुती ३ गोष्टींचा वापर करुन तुम्ही तुमचे पाय गोरे आणि स्वच्छ करु शकता.
आधी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिक्स करा. तयार केलेल्या पाण्यात अर्धातास पाय बुडवून बसा आणि मग स्वच्छ करुन घ्या.
२ चमचे बेसनमध्ये किंचिंत हळद, दूध, गुलाबजल मिक्स करुन पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट १० मिनिटे पायांवर लावा आणि नंतर पाय स्वच्छ धुवून घ्या.
नारळ तेलात मीठ मिक्स करुन स्क्रब बनवा आणि ते पायांवर समान पध्दतीने लावा . यानंतर गुलाबपाणी आणि कोरफड जेल मिक्स करुन पायांवर मसाज करा.
या तीन स्टेप्स फॉलो केल्यानंतर पाय टॉवेलने पुसून घ्या. सुकल्यानंतर पायांना मॉइश्चराइजर लावा. आता तुमचे पाय स्वच्छ आणि चमकदार दिसतील.
हे उपाय आठवड्यातून दोनदा करावे. पाय काळपट दिसणार नाही आणि सुंदर दिसू लागतील.