Summer Tips : उन्हाळ्यात पुदिना अन् कोथिंबीर जास्त दिवस फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुदिना आणि कोथिंबीर

जेवणाचा स्वाद वाढवणारे पुदिना आणि कोथिंबीर उन्हाळ्यात लवकर खराब होतात. पण काही घरगुती टिप्सचा वापर करुन तुम्ही योग्यरित्या स्टोर करु शकता.

Coriander and Mint | GOOGLE

पाण्यात देठ बुडवा

पुदिना आणि कोथिंबीरचे देठ कापून घ्या आणि एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात बुडवा. पानांना प्लास्टिकच्या पिशवीने गुंडाळून घ्या आणि फ्रिजमध्ये ठेवा.

storage tips | GOOGLE

ओल्या कापडाने गुंडाळा

पाने नीट धुवून सुकवा, नंतर ओल्या सुती कापडात गुंडाळा आणि नंतर झिपलॉक बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. हि पाने १५ ते २० दिवस ताजी राहतील.

Ziplock Bag | GOOGLE

गोठवून ठेवा

पाने धुवून बारिक चिरुन घ्या. मिक्सरमध्ये पानांची प्युरी बनवून घ्या. ही तयार केलेली प्युरी आईस क्यूब ट्रेमध्ये थोडे पाणी किंवा ऑलिव्ह ऑइल घालून गोठवा. जेव्हा गरज असेल तेव्हा प्युरी केलेले क्यूब वापरा.

Puree Cube | GOOGLE

योग्य तापमान

पाने फ्रिजमधील सर्वात थंड ठिकणी ठेवा. फळांसोबत साठवू नका, कारण की, त्यातून निघणाऱ्या वायूंमुळे पाने लवकर खराब होऊ शकतात.

Right temperature | GOOGLE

सुकवणे

जर तुम्हाला पाने जास्त काळ साठवायची असतील तर ती धुवून सुकवा आणि हवाबंद डब्यात ठेवा.

Dry Leaves | GOOGLE

काळजी घेणे

पाने धुतल्यानंतर ती पूर्णपणे सुकवून घ्या कारण की, ओलाव्यामुळे पाने लवकर कुजण्यास सुरुवात होऊ शकते.

care | GOOGLE

विशेष टीप

उन्हाळ्यात पाने फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी जास्त वेळ बाहेर ठेवू नका.

Important Tip | GOOGLE

Dry Fruits Storage Tips : ड्रायफ्रुट्स जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी जाणून घ्या या स्मार्ट स्टोरेज टिप्स

Dry Fruits Storage Tips | GOOGLE
येथे क्लिक करा