Samsung च्या 5G फोनवर जबरदस्त ऑफर; 32MP सेल्फी कॅमेरा असलेला या फोनवर मिळत आहे 5500 रुपयांची सूट

Samsung Galaxy A54 5G: जर तुम्ही सॅमसंगकडून 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.
Samsung Galaxy A54 5G
Samsung Galaxy A54 5GSaam Tv

Samsung Galaxy A54 5G:

जर तुम्ही सॅमसंगकडून 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण सॅमसंग आपल्या स्टायलिश आणि जबरदस्त फीचर्स असलेला Samsung Galaxy A54 5G हा स्मार्टफोन अॅमेझॉन-फ्लिपकार्ट या दोन्हींवर स्वस्तात विकत आहे.

हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह येतो. सध्या Amazon-Flipkart 5500 रुपयांच्या सवलतीत हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. यासोबतच बँक आणि एक्सचेंज डिस्काउंटचा फायदा घेऊन ग्राहक हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात. फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Samsung Galaxy A54 5G
Google ने दिली आनंदाची बातमी! आता Android फोनमध्ये मिळणार 4 नवीन फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सॅमसंगचा Galaxy A54 5G फोन 40,999 रुपये किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. आता हा फोन अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन 35,499 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. बँक ऑफर मिळाल्यानंतर याफोनवर आणखी 2,000 रुपयांची ग्राहकांना सूट मिळणार आहे. (Latest Marathi News)

यासोबतच फोनवर 23,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही मिळत ​​आहे. हा एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड यावर अवलंबून असेल. जर तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करून योग्य किंमत मिळाली तरी तुम्हाला आणखी स्वस्तात हा फोन खरेदी करता येईल.

Samsung Galaxy A54 5G
Upcoming Cars: पॉवरफुल इंजिन, डॅशिंग लूक; Toyota Cars घेऊन येत आहे नवीन SUV, Kia च्या या आकारला देणार टक्कर

Samsung Galaxy A54 5G स्पेसिफिकेशन

सॅमसंगच्या या 5G फोनमध्ये तुम्हाला 1080x2340 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.4 इंच फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. यूजर्स मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनची मेमरी 1 टीबी पर्यंत वाढवू शकतात. कंपनी या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा 12-मेगापिक्सेल आणि 5-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सेल कॅमेरा देत आहे. फोनमधील बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 21 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देते, असा कंपनीचा दावा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com