Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट

Maharashtra Today Weather News : महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. कोकणात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला असून १७ ते २० मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट
Maharashtra Today Weather NewsSaam Tv
Published On
Summary
  • अमरावतीत ४१.८°C तापमानाची नोंद; देशातील सर्वाधिक उष्ण शहर

  • कोकणात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला

  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १७ ते २० मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

  • काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी

Maharashtra Today Weather News एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने, पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावतीत राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. आज कोकणात उष्ण लाटेचा, तर येत्या १७ ते २० मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सलग तिसऱ्या दिवशीही अमरावती जिल्हा देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. आजही ४१.८ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमान ४० अंशापार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते.

Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट
Rain Alert : ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, पुण्यासह या जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

दरम्यान आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोकण येथे उष्ण लाटेची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट
Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा व तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १७ मार्च ते २० मार्च दरम्यान हा पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com