उत्तर प्रदेशामधील देवरिया (Deoria) जिल्ह्यामध्ये एक ह्रदयद्रावक घटना घटली आहे. सकाळी चहा बनवताना अचानक सिंलेडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात अवघ्या ११ महिन्यांच्या बालकासह २ लहान मुलांचा आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. देवरिया जिल्ह्यामधीलम डुमरी गावातमधील ही घटना आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Lates Marathi News)
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना डुमरी गावात (ता.३०)रोजी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेत आरती देवी( वय.३५) तसेच त्यांची मुलं आचंल , कुंदल आणि अवघ्या ११ महिन्यांची मुलगी असे या घटनेत मृत झालेल्या सदस्यांची नाव आहेत. आरती या सकाळी शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी आल्या असता अचानक सिलेंडरचा स्फोट(Blast) झाला.
स्फोट झाल्याने घराला आग लागली आणि आग दुसऱ्या खोलीत पसरली. आग इतकी मोठी होती की आरती यांची स्वयंपाक घरातील बाजूच्या खोलीत झोपलेल्या तीन मुलांचा आगीत मृत्यू झाला. या घटनेत महिलेचा पती शिशंकर गुप्ता घराबाहेर असल्याने त्याचा जीव वाचला. या जोरदार स्फोटामुळे स्फोट झालेल्या खोलीच्या छताला तडे गेले असून घराच्या भिंतींनाही तडे गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल असता त्यांनी तात्काळ घरातील आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.