International women's Day: राज्याचे चौथे महिला धोरण; 'वर्क फ्रॉम होम'ला प्रोत्साहन, मिळेल मातृत्व आणि पितृत्वाची रजा

International women's Day: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे चौथे महिला धोरण उद्या जाहीर करण्यात येणार आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस या धोरणात करण्यात आलीय.
International women's Day
International women's DayGoogle

International Womens Day States Fourth Womens Policy:

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर करण्यात येणार आहे. यात खासगी कंपन्यांमध्ये मातृत्व आणि पितृत्व रजेचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारसही या धोरणात करण्यात आलीय.(Latest News)

मात्र केंद्र सरकारच्या धोरणानुसार मासिक पाळीमध्ये रजा देण्याची शिफारस मंत्रिमंडळाने नाकारलीय. ही सुविधा केवळ ऊसतोड कामगार महिलांना मिळणार असून या काळात भरपगारी रजेची त्यांना मिळणार असल्याची तरतूद करण्यात आलीय, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आतापर्यंत मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जात होतं. काहीजण स्वेच्छेने आईचेही नाव लावत होते. मात्र चौथ्या महिला धोरणामधील तरतुदीनुसार यापुढे अधिकृत कागदपत्रांवरही आईचे नाव लावण्याची पद्धत सुरू होणारय. चौथ्या धोरणामध्ये महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी अनेक प्रोत्साहनांचा समावेश करण्यात आलाय. यात सर्व महिलांना हॉटेलसाठी स्थानिक करात १० टक्के, व्यावसायिक करातून १० टक्के सूट आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात १० टक्के आरक्षण देण्याची तरतुद देखील करण्यात आलीय. महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांसाठी भूखंड तसेच आरक्षित प्रवर्गातील महिलांसाठी प्राधान्य अशा प्रकारच्या सवलती देण्यात येतील.

International women's Day
Farmer News: ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com