Gas Cylinder Blast : होळीच्याच दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर; गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच मृत्यू

Jalgaon News : स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. लाकडी छत व घरात कापूस साठवून ठेवला असल्याने आगीने लागलीच रौद्र रुप धारण केले.
Gas Cylinder Blast
Gas Cylinder BlastSaam tv

अमळनेर (जळगाव) गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना होळीच्याच (Amalner) दिवशी घडली. सदर घटना पिंपळी (ता, अमळनेर) येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेत परिवारातील अन्य सदस्य मात्र सुदैवाने बचावले आहेत. (Live Marathi News)

Gas Cylinder Blast
Electric Shock : ट्रॅक्टरला मेन विद्युत लाईनची तार चिकटली; एका ऊसतोड महिला मजुराचा मृत्यू

दिलीप नामदेव पाटील असे या घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी दिलीप पाटील यांच्या घरात अचानक (Gas Cylinder) सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. लाकडी छत व घरात कापूस (Cotton) साठवून ठेवला असल्याने (Fire) आगीने लागलीच रौद्र रुप धारण केले. यामुळे (Jalgaon) संपूर्ण घराला आग लागली. यावेळी दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा आणि नात लागलीच घराच्या बाहेर पळत आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gas Cylinder Blast
Nanded News : साखर गाठीच्या व्यवसायातून कुटुंब कमवतोय लाखो रुपये

मात्र आगीमुळे दिलीप पाटील यांना चक्कर आल्याने ते घरात पडले. संपूर्ण घराला आग लागल्याने दिलीप पाटील यांना बाहेर पडता आले नाही. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या साधनाचा वापर करुन प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात आली नाही. यानंतर अमळनेर अग्निशमन विभागाला आगीची माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोचत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत संपूर्ण संसार उध्वस्त झाला होता. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com