Electric Shock : ट्रॅक्टरला मेन विद्युत लाईनची तार चिकटली; एका ऊसतोड महिला मजुराचा मृत्यू

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शिवाजी बापू नागवडे साखर कारखान्याचे मजूर २४ मार्चला रात्री दहा वाजता ऊसतोडचे काम संपून गावाकडे निघाले होते.
Electric Shock
Electric ShockSaam tv

सुशील थोरात 

अहमदनगर : ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमध्ये सामान घेऊन जात असताना रस्त्यावरून गेलेली विद्युत लाईनची तार खाली (Ahmednagar) लोंबकळलेली असल्याने या तारेचं स्पर्श ट्रॅक्टरला झाला. यामुळे जोरदार झटका बसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही घटना हातवळण- बनपिंपरी रस्त्यावर घडली.  (Breaking Marathi News)

Electric Shock
Mahad Holi Utsav : होळीनिमित्ताने देव-दानवांच्या युद्धाची अनोखी परंपरा; दोन गट एकमेकांवर फेकतात पेटते निखारे

अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शिवाजी बापू नागवडे साखर कारखान्याचे (Sugar Factory) मजूर २४ मार्चला रात्री दहा वाजता ऊसतोडचे काम संपून गावाकडे निघाले होते. यावेळी सर्व मजुरांनी ट्रॅक्टरमध्ये सर्व संसाराचे साहित्य भरून मार्गस्थ झाले होते. हातवळण - बनपिंपरी या  मार्गाने जात असताना ट्रॅक्टरला महावितरणच्या मेन लाईनला तार (Electric Shock) चिकटली. यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एका मजुर ,महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Electric Shock
Pandharpur News : विठ्ठल मंदिराला मुळ रूप देण्याचे काम सुरू; वास्तुशिल्पाचे आयुर्मान सातशे वर्षांनी वाढणार

जखमी रुग्णालयात दाखल  

सदरच्या घटनेत फुलाबाई नरसिंह जाधव या महिला मजुराचा मृत्यू झाला तर अंकुश रोहिदास जाधव हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com