Mahad Holi Utsav : होळीनिमित्ताने देव-दानवांच्या युद्धाची अनोखी परंपरा; दोन गट एकमेकांवर फेकतात पेटते निखारे

Mahad News : होळीची पूजा केल्यानंतर होम लावल्यानंतर जळकी लाकडे एकमेकांच्या अंगावर फेकण्याची परंपरा याला देव दानवाचे युद्ध म्हटले
Mahad Holi Utsav
Mahad Holi UtsavSaam tv
Published On

सचिन कदम 

महाड (रायगड) : सर्वत्र होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार होळीतील पेटते निखारे एकमेकांच्या अंगावर फेकून प्रतिकात्मक देव दानवाचे युद्ध खेळण्याची अनोखी परंपरा (Raigad) रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये आहे. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम आहे. (Tajya Batmya)

Mahad Holi Utsav
Water Shortage: पैनगंगा नदीकाठावरील ४२ गावांत तीव्र पाणी टंचाई; हंडाभर पाण्यासाठी रानावनात भटकंती

महाडमधील (Mahad) गवळ आळी येथे ही अनोखी परंपरा आहे. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या होळीला आजही जपली जात आहे. होळीची पूजा केल्यानंतर होम लावल्यानंतर जळकी लाकडे एकमेकांच्या (Holi Festival) अंगावर फेकण्याची परंपरा याला देव दानवाचे युद्ध म्हटले जाते. होळीमध्ये ठेवलेला प्रसाद आळीतील एक गट होळी होळी केल्यानंतर घेऊन पाळतो. दुसऱ्या गटाला हा प्रसाद मिळत नाही. यामुळे प्रसाद घेऊन जाणारा दानव असतो, तर दुसरा गट देव मानला जातो. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahad Holi Utsav
Sambhajinagar Water Shortage : छत्रपती संभाजीनगर शहरावर पाणी कपातीचे संकट; हसूलमध्ये महिनाभर पुरेल इतकाच साठा

एकमेकांवर फेकतात निखारे 

होमच्या दोन्ही बाजूला दोन्ही गटांकडील नागरिक एकत्र येतात आणि हातातील पेटत लाकूड समोरील रहिवाशांच्या अंगावर फेकतात. या युद्धात कोणालाही भाजत नाही. अथवा कोणीही जखमी होत नाही; हे येथील वैशिष्ट्य आहे. हा खेळ पहाण्यासाठी नागरिक करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com