Water Shortage: पैनगंगा नदीकाठावरील ४२ गावांत तीव्र पाणी टंचाई; हंडाभर पाण्यासाठी रानावनात भटकंती

Yavatmal News : यंदा सरासरीपेक्षा कमी यामुळे राज्यातील सर्वच भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच अनेक भंगार पाणी टंचाईचा सामना करावा लागत
Yavatmal Water Shortage
Yavatmal Water ShortageSaam tv

संजय राठोड

यवतमाळ : यंदाच्या कमी पावसाचा फटका सर्वत्र बसत आहे. यात यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील (Yavatmal) पैनगंगा नदीकाठावरील ४२ गावात तीव्र पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे. यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी रानावनात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. (Latest Marathi News)

Yavatmal Water Shortage
Shambhuraj Desai : इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हरिभक्त पारायण महाराजांचे कीर्तन...

यंदा सरासरीपेक्षा कमी (Rain) पाऊस झाल्यामुळे राज्यातील सर्वच भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच अनेक भंगार पाणी टंचाईचा (Water Crisis) सामना करावा लागत आहे. नदी, धरणातील पाणी साठा कमी होत असल्याने पाण्याची समस्या पुढील दोन महिन्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. या करीता टंचाई आराखडा आखून त्रनकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yavatmal Water Shortage
Chalisgaon News : शेतकऱ्याने शेतात जात संपविले जीवन

यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदी काठावरील ४२ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून  पाटबंधारे विभागाचे कर्मचारी सध्या निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने पैनगंगा नदीत पाणी सोडण्यास अडचण येत आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी कोसोदूर कडक ऊन्हात पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. ४२ गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून ऐन निवडणुकीच्या काळात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com