Breaking News: नागपूर-तुळजापूर महामार्गावर कार पेटली; ४ जण होरपळले, कारचा कोळसा, यवतमाळमध्ये थरार

Car Burnt In Yavatamal News : यवतमाळ जिल्ह्यातील कळंबजवळील महामार्गावर एक कार जळून खाक झाली आहे. या घटनेत चारजण भाजल्याची माहिती मिळत आहे.
Car Burnt In Yavatamal
Car Burnt In YavatamalSaam Tv

संजय राठोड

Car Burnt On Nagpur Tuljapur Highway

यवतमाळ जिल्ह्यातील कळंबजवळ एक कार जळून खाक झाली आहे. या घटनेत चारजण होरपळल्याची माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं (Car Burnt) आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबजवळ (Kalamb On Nagpur Tuljapur Highway) ही घटना घडली आहे. (latest marathi news)

ही कार यवतमाळवरून नागपूरला जात होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आगीत जळालेली चौघेही नागपूरचे रहिवाशी असल्याचं समोर (Car Burnt On Nagpur Tuljapur Highway) आलं आहे. सध्या तेथील तापमान 39 अंश सेल्सिअस एवढे आहे. त्यामुळेच आग लागली असावी, असा अंदाज पोलीसांनी लावला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उन्हामध्ये कारने अचानक पेट घेतला

कारचा जळून कोळसा झाला आहे. महामार्गावर कार जळत असताना धुराचे मोठमोठे लोट निघताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ १७ सेकंदाचा (Car Burnt In Yavatamt) आहे. व्हिडिओमध्ये कार जळत असताना दिसत आहे. यवतमाळवरून येणाऱ्या कारने नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबजवळ अचानक पेट घेतला.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या आगीत चारजण होरपळले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात (Breaking News) आहे. तीव्र उन्हामध्ये कारने अचानक पेट घेतल्याचं दिसत आहे. या घटनेत गाडीचा जळून कोळसा झाला आहे.

Car Burnt In Yavatamal
Godan Express Fire : मुंबईहून निघालेल्या गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला आग; नाशिकजवळ थरारक घटना, प्रवाशांची पळापळ

उल्हासनगरमधील घटना

उल्हासनगरममध्ये १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती. काही व्यक्तींनी रिक्षा जाळण्याच्या हेतुने लावलेल्या आगमध्ये कारखाना देखील जळाला होता. या आगीत रिक्षाचा जळून कोळसा झाला (Fire News) होता. उल्हासनगरच्या गायकवाड पाडा परिसरात अज्ञात समाजकंटकांनी रिक्षाला आग लावून जाळुन दिल्याची घटना घडली होती.

या आगीचं स्वरूप अतिशय भीषण होतं. आगीच्या झळा बाजूला असलेल्या जीन्स कारखान्याला लागल्या होत्या.या दुर्घटनेत जीन्स कारखाना देखील मोठ्या प्रमाणावर जळाला होता. या घटनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं होतं.

Car Burnt In Yavatamal
Khadawali Fire News: खडवली नदी किनारी भीषण अग्नितांडव; जीव मुठीत घेऊन आलेल्या पर्यटकांची पळापळ, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com