Bhatsa Riverside Hotel Catch fire
Bhatsa Riverside Hotel Catch fireSaam Tv

Khadawali Fire News: खडवली नदी किनारी भीषण अग्नितांडव; जीव मुठीत घेऊन आलेल्या पर्यटकांची पळापळ, VIDEO व्हायरल

Bhatsa Riverside Hotel Catch fire: खडवलीत भातसा नदी किनारी असलेल्या हॉटेल आणि ढाब्यांना आग लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published on

अभिजीत देशमुख

Fire Viral Video

खडवली येथील भातसा नदी हे ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण (Thane News) आहे. खडवली येथील भातसा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व ढाब्यांना काल दुपारी (१७ मार्च) अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडल्याचं दिसलं आहे. (latest viral news)

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Bhatsa Riverside Hotel Catch Fire) आहे. या परिसरात असलेल्या गावकऱ्यांनी नदीचं पाणी मारून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार वारा वाहत असल्यामुळं आग वेगात पसरत होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हॉटेल आणि ढाब्यांना आग

अखेर काही लोकांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर त्यांना या आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या घटनेमुळे या परिसरातील हॉटेल, ढाबाचालक सुरक्षिततेच्या दृष्टीने (Bhatsa River) कोणतीही उपाययोजना करत नसल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.

खडवलीत भातसा नदी किनारी असलेल्या हॉटेल आणि ढाब्यांना आग लागल्याची घटना (khadawali Fire) घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भातसा नदीच्या किनाऱ्यावर (Fire Viral Video) भीषण अग्नीतांडव पाहायला मिळालं आहे. यामुळे उपस्थित नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

Bhatsa Riverside Hotel Catch fire
Viral Accident Video: भयंकर! भरधाव कारने सायकलस्वार अन् दुचाकीला उडवले, २ ठार; | थरारक अपघाताचे CCTV फुटेज

आगीत दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

नदीकिनारी सर्व लोकं आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत (viral news) होते. व्हिडिओमध्ये नागरिकांची धावपळ दिसून येत आहे. हॉटेलला आग लागल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या आगीत दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं (viral video) दिसत आहे.

सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत (khadawali Fire News) असतात. या व्हिडिओमध्ये नदीकिनारी भीषण अग्नितांडव आणि नागरिकांची धावपळ दिसत आहे.

Bhatsa Riverside Hotel Catch fire
Viral Snake Video: किचनमध्ये काम करताना जरा जपून! फ्रीजमागे लपला होता भलामोठा कोब्रा; VIDEO पाहून थरकाप उडेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com