Shambhuraj Desai : इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हरिभक्त पारायण महाराजांचे कीर्तन...

Shambhuraj Desai on indurikar maharaj : 'हरिभक्त पारायण महाराजांचे कीर्तन आणि होणारे राजकीय सभा हे दोन भिन्न विषय आहेत, या दोघांना वेगवेगळे नियम लावले पाहिजे, अशी प्रतिक्रिया देसाईंनी दिली.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai Saam tv

Shambhuraj Desai News :

शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाला ५००० दिले तर धंदा मांडला टीका होते. मात्र, राजकीय सभांना पाच कोटींचा खर्च केला जातो, त्याचं काय? असा प्रश्न कीर्तनकार इंदुरीकरांनी उपस्थित केला होता. यावर शंभूराज देसाईंनी भाष्य केलं. 'हरिभक्त पारायण महाराजांचे कीर्तन आणि होणारे राजकीय सभा हे दोन भिन्न विषय आहेत, या दोघांना वेगवेगळे नियम लावले पाहिजे, अशी प्रतिक्रिया देसाईंनी दिली. (Latest Marathi News)

शंभूराज देसाई आज रविवारी सातारा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या जागावाटपावर मोठं भाष्य केलं. 'महायुतीतील भाजपने ज्या जागा जाहीर केल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त उरलेल्या जागांच्या वाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झालेली आहे. त्यानंतर माझी आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली नाही. परंतु निश्चितच समन्वयाने आणि सन्मानपूर्वक लवकरच तोडगा निघेल'.

Shambhuraj Desai
UP Lok Sabha: बसपाची पहिली यादी जाहीर, मायावतींनी केली 16 उमेदवारांच्या नावाची घोषणा

राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का?

मनसे आणि महायुतीच्या सामील होण्याच्या शक्यतेवर भाष्य करताना शंभूराज देसाई म्हणाले, 'शिंदेंच्या शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरेंनीच करावं अशी दिल्ली येथील बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. याबाबत शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमची कोणाचीही चर्चा झालेली नाही. आम्हाला फक्त एवढंच समजलं आहे की, महायुतीतील मित्रपक्ष म्हणून मनसेला महायुतीत समाविष्ट करून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा दिल्लीला झालेली आहे. राज ठाकरेंसारखा जनाधार असलेला नेता महायुतीमध्ये समाविष्ट होत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू'.

विजय शिवतारेंविषयी शंभूराज देसाई काय म्हणाले?

विजय शिवतारे यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याविषयी शंभूराज देसाई म्हणाले की,'विजय शिवतारे हे येत्या 12 एप्रिलला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 12 एप्रिलला माझ्या माहितीप्रमाणे अजून पंधरा दिवस बाकी आहेत. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मी विजय बापू शिवतारेंची तीन वेळा गाठ घेतलेली आहे. त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे.

Shambhuraj Desai
Maharashtra Lok Sabha Election : हेमंत गोडसे शेकडो वाहनांसह मुंबईच्या दिशेने रवाना; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

'पक्षाच्या वतीने महायुतीचा जो धर्म आहे, तो तुम्हाला पाळावा लागेल. पक्षाच्या विरोधात तुम्हाला भूमिका घेता येणार नाही. विजय शिवतारे यांनी आता वक्तव्य केलेलं आहे, याचा अर्थ त्यांनी अर्ज भरला असा होत नाही. तरीसुद्धा असं जर ते बोलले असतील, तर पक्षाचा आदेश डावलून ते वेगळी भूमिका घेतील असं मला वाटत नाही, असे ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com