UP Lok Sabha: बसपाची पहिली यादी जाहीर, मायावतींनी केली 16 उमेदवारांच्या नावाची घोषणा

Lok Sabha Election 2024: बसपाने लोकसभा निवडणूक 2024 साठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Mayawati
MayawatiSaam Tv

BSP first candidates list:

उत्तर प्रदेशात यंदा मुख्य लढत ही भाजप आणि सांजवाडी पक्षात जरी असली तरी बसपा हा पक्ष देखील महत्त्वाचा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांचा पक्ष असलेल्या बसपाने उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांमधील 11 जागांवर विजय मिळवला होता. यातच आज बसपाने लोकसभा निवडणूक 2024 साठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

या यादीत 16 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये 7 उमेदवार मुस्लिम आहेत. माजिद अली हे सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून बसपाचे उमेदवार असतील. मायावतींनी कैरानातून श्रीपाल राणा आणि सहारनपूरमधून माजीद अली याना उमेदवारी दिली आहे. येथे माजीद अली यांची काँग्रेसच्या इम्रान मसूद यांच्याशी स्पर्धा होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mayawati
Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभेत ठाकरे गट वापरणार 'दिघे' कार्ड, केदार दिघे यांना दिली जाऊ शकते उमेदवारी

बसपाने मुझफ्फरनगरमधून दारा सिंह प्रजापती यांना उमेदवारी दिली आहे. बिजनौरमधून विजेंद्र सिंग, नगीनामधून सुरेंद्र पाल सिंग आणि मुरादाबादमधून मोहम्मद इरफान सैफी यांना संधी दिली आहे. याशिवाय संभलमधून शौलत अली आणि अमरोहामधून मुजाहिद हुसेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मेरठमधून देवव्रत त्यागी, बागपतमधून प्रवीण बन्सल, गौतम बुद्ध नगरमधून राजेंद्र सिंह सोलंकी, बुलंदशहरमधून गिरीशचंद्र जाटव, आमलामधून आबिद अली, पीलीभीतमधून अनीस अहमद खान उर्फ ​​फूलबाबू आणि शाहजहांपूरमधून दोद्रम वर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.

Mayawati
Maharashtra Loksabha : प्रहार जनशक्ती महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता; ६ एप्रिलला करणार उमेदवाराची घोषणा

मुस्लिमबहुल मतदारसंघ असलेल्या रामपूरमध्ये बसपाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी झीशान खान यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. रामपूरमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असून त्यासाठी उमेदवारी प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 26 आणि 27 मार्च हे दोनच दिवस उरले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com