Maharashtra Lok Sabha Election : हेमंत गोडसे शेकडो वाहनांसह मुंबईच्या दिशेने रवाना; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : हेमंत गोडसे नाशिकहून शेकडो गाड्या घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईला रवाना झाले आहेत. लोकसभा मतदारसंघाप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावल्याची माहिती आहे.
Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
Published On

Maharashtra Lok Sabha Election

नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिंदे गटाकडे असून हेमत गोडसे विद्यमान खासदार आहेत. मात्र महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू अशताना शिंदे गटाने हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे सध्या या मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान आज हेमंत गोडसे नाशिकहून शेकडो गाड्या घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईला रवाना झाले आहेत. लोकसभा मतदारसंघाप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावल्याची माहिती आहे.

नाशिकच्या जागेवर फक्त भाजपचाच हक्क असून हेमंत गोडसे आतापर्यंत भाजपमुळेच खासदार झाल्याचा दावा स्थानिक कार्यकर्ते करीत आहेत. यासाठी भाजप नेत्यांनी एक बैठक देखील घेतली आहे. नाशिकमध्ये भाजपचे ३ आमदार आणि ६६ नगरसेवकांची ताकद असल्याने या जागेवर भाजपचा उमेदवार अगदी सहजपणे निवडून येऊ शकतो, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार हेमंत गोडसे यांनी युतीधर्म पाळला नसून भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार देखील केली आहे.

Maharashtra Lok Sabha Election
Lok Sabha Elections 2024: बसपाचा डबल बार; एकाच दिवशी लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महायुतीत चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण, नाशिक लोकसभेची जागा आम्हालाच मिळावी, असा आग्रह भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून वारंवार केला जातोय.

मोदी-शहांचं लोकसभेत ४०० पार खासदार निवडून येण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची नाशिकची जागा भाजपलाच सोडण्यात यावी, अशी मागणी भाजप पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्षांनी वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून भाजप शिंदे गटावर दबावतंत्राचा वापर करतंय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Lok Sabha Election
Mahadev Jankar : 'रासप'चं ठरलं; महादेव जानकरांची महायुतीला साथ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com