Lok Sabha Elections 2024: बसपाचा डबल बार; एकाच दिवशी लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

BSP Candidate Second list news : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा आणि जागावाटपाच्या बैठकीमध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान, बहुजन समाज पक्षाने एकाच दिवशी उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.
Mayavati
Mayavati Saam tv
Published On

BSP Candidate Second list:

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा आणि जागावाटपाच्या बैठकीमध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान, बहुजन समाज पक्षाने एकाच दिवशी उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. बसपाने रविवारी सकाळी १६ उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर आज सायंकाळी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. बसपाने दुसऱ्या यादीत ९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. (Latest Marathi News)

बहुजन समाज पक्षाने आज रविवारी दिवसभरात २५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीत बसपाने हाथरसमधून हेमबाबू धनगर, मथुरातून कमल कांत उपमन्यू, आगऱ्यातून पूजा अमरोही, फतेहपूर सीकरीमधून राम निवास शर्मा, फिरोझाबादमधून सतेंद्र जैन सौली, इटावातून सारिका सिंह बघेल, कानपुरातून कुलदीप भदौरिया, अकबरपूरमधून राजेश कुमार द्विवेदी, जालौनमधून सुरेश चंद्र गौतम यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

Mayavati
BSP chief Mayawati: ना INDIA ना NDA... बसपा प्रमुख मायावतींची मोठी घोषणा; आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा

बहुजन समाज पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले आहे. त्यातच आज बसपाने २५ उमेदवारांची घोषित वाढल्याने काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवारांची चिंता वाढल्याचं बोललं जात आहे

Mayavati
Lok Sabha Election: कंगना लोकसभेच्या रिंगणात! हिमाचलमधून मिळालं तिकीट, राज्यातील 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा; भाजपची 5वी यादी जाहीर

काँग्रेसने सहारनपूरमधून इमरान मसूद यांना संधी दिली आहे. तर या जागेवर बसपाने माजिद अली यांना उमेदवारी दिली आहे. मागच्या वेळी बसपाने फजलुर्रहमान यांना उमेदवारी दिली होती. मात्र, यंदा त्यांची तिकीट कापलं आहे. बसपाने अमरोहामधून मुजाहिद हुसैन यांना उमेदवारी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com