Lok Sabha Election: कंगना लोकसभेच्या रिंगणात! हिमाचलमधून मिळालं तिकीट, राज्यातील 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा; भाजपची 5वी यादी जाहीर

BJP 5th List of Candidate: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अभिनेत्री कंगना राणौत हीचही नाव आहे. भाजपने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
BJP 5th List of Candidate
BJP 5th List of CandidateSaam Tv
Published On

BJP 5th List of Candidate:

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अभिनेत्री कंगना राणौत हीचही नाव आहे. भाजपने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तसेच आजच पक्षात प्रवेश केलेल्या नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्र, हरियाणातून उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यात 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा

या यादीत राज्यातीलही तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा सुनील मेंढे यांना संधी दिली आहे. तर सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर महाराज यांच तिकीट कपात अमर राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच गडचिरोली चिमूर येथून अशोक नेते यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP 5th List of Candidate
Amravati Lok Sabha: 'राजकारणात शून्य झालो तरी चालेल, शरणागती पत्करणार नाही', राणा दाम्पत्यांविरोधात बच्चू कडू आक्रमक

वरुण गांधी यांचा तिकीट कापलं

भाजपने या यादीत उत्तर प्रदेशमधील 13 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने बरेली, बदाऊन आणि पिलीभीतसह आठ खासदारांची तिकिटे कापलीआहेत. त्यांच्या जागी इतरांना संधी देण्यात आली आहे. भाजपने ज्यांची तिकिटे कापली त्यात संतोष गंगवार, वरुण गांधी, संघमित्रा मौर्य, राजेंद्र अग्रवाल, सत्यदेव पचौरी, अक्षयवर लाल गोंड, उपेंद्र सिंह रावत आणि राजवीर दिलर यांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

वरुण गांधी यांच्यावर पक्षविरोधी धोरणे राबवल्याचा आरोप आहे. तर संतोष गंगवार यांना त्यांचे वय लक्षात घेऊन तिकीट दिलेले नाही. 13 जागांवर भाजपने सहारनपूरमधून राघव लखनपाल, गाझियाबादमधून अतुल गर्ग, बदायूंमधून दुर्गविजय सिंह शाक्य, मुरादाबादमधून सर्वेश सिंग, मेरठमधून अरुण गोविल, बरेलीमधून छत्रपाल गंगवार, पीलीभीतमधून जितिन प्रसाद, सुलतानपूरमधून मनेका गांधी, सुलतानपूरमधून मेनका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. कानपूरमधून सतीश गौतम, बहराइचमधून अरविंद गोंड, बाराबंकीमधून राजरानी रावत, हाथरसमधून अनूप वाल्मिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

BJP 5th List of Candidate
UP Lok Sabha: बसपाची पहिली यादी जाहीर, मायावतींनी केली 16 उमेदवारांच्या नावाची घोषणा

दरम्यान, 2 मार्च रोजी भाजपने पहिली यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये 195 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 51 जागांवर यूपीमधील उमेदवारांचा समावेश होता. यानंतर भाजपने दुसरी, तिसरी आणि चौथी यादीही जाहीर केली. मात्र या यादीत यूपीच्या उमेदवारांची नावे नव्हती. यूपीच्या होल्ड जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यासाठी भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या अनेक बैठका घेतल्या आहेत. काही बैठकाही पुढे ढकलण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नावांवर जागानिहाय चर्चा झाली आणि आज पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com