Mahadev Jankar : 'रासप'चं ठरलं; महादेव जानकरांची महायुतीला साथ

Mahadev Jankar News in marathi : महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच या बैठकीमध्ये महायुतीने रासपला एक जागा सोडणार असल्याचा निर्णय घेतला.
Mahadev Jankar
Mahadev Jankar Saam tv
Published On

Mahadev Jankar News in Marathi :

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीला साथ दिली. आज रविवारी महादेव जानकर आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच या बैठकीमध्ये महायुतीने रासपला एक जागा सोडणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

आज रविवारी महादेव जानकर यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते.

Mahadev Jankar
Kisan Jadhav On Baramati Seats | बारामती लोकसभेच्या जागेसंदर्भात किसन जाधव काय म्हणाले?

या बैठकीनंतर महादेव जानकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय'. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत, असे जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Mahadev Jankar
Manoj Jarange: अंतरवाली सराटीतील निर्णायक बैठकीआधी मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, 'मला तडीपार...'

महायुतीचे नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत रासप लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. 'महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असेही जानकरांनी सांगितले.

बैठकीनंतर जानकर काय म्हणाले?

या बैठकीनंतर महादेव जानकर म्हणाले, 'मी भाजपवर नाराज होतो, पण आता जागा दिली. त्यामुळे नाराज नाही. एक ते दोन दिवसात कळेल, मला कुठली जागा देणार. मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. मी महविकास आघाडीला तीन जागा मागितल्या होत्या, पण ते एकच देत होते. भाजप सुद्धा मला एक जागा देत आहे म्हणून मी महायुतीत सामील झालो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com