Sambhajinagar Water Shortage : छत्रपती संभाजीनगर शहरावर पाणी कपातीचे संकट; हसूलमध्ये महिनाभर पुरेल इतकाच साठा

Sambhajinagar News : यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यात छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात आली आहे
Sambhajinagar Water Shortage
Sambhajinagar Water ShortageSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील काही वॉर्डाना पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात (Water Scarcity) महिनाभर पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. शिवाय जायकवाडी जलाशयातील पाण्याचे देखील बाष्पीभवन वाढल्याने साठा २२ टक्क्यांवर आला. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून (Sambhajinagar) शहर वासियांवर आणखी पाणी कपातीचे संकट उभे आहे. (Live Marathi News)

Sambhajinagar Water Shortage
Water Shortage: पैनगंगा नदीकाठावरील ४२ गावांत तीव्र पाणी टंचाई; हंडाभर पाण्यासाठी रानावनात भटकंती

यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईचा (Water Crisis) सामना करावा लागत आहे. यात छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात आली आहे. तर आता पुढील  एक-दोन आठवड्यात काही भागात देखील पाणी कपात करण्याची वेळ येणार आहे. हर्सूल तलावात असलेला पाणीसाठा (Jayakwadi Dam) देखील कमी झाला असून केवळ महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने पाणी कपातीचे संकट उभे आई. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar Water Shortage
Water Shortage: पैनगंगा नदीकाठावरील ४२ गावांत तीव्र पाणी टंचाई; हंडाभर पाण्यासाठी रानावनात भटकंती

महापालिका प्रशासनाकडून आतापासूनच नियोजन सुरू आहे. सध्या शहराला ७ ते ८ दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो, मात्र आठ दिवसांनी पाणी पुरवठा करूनही पाणी पुरणार नसल्याने आता मनपाचे चांगली दमछाक होणार आहे. दरम्यान शहरात दररोज १४५ एमएलडी पाण्याची आवक होते, असा दावा महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून केला जातो. परंतु प्रत्यक्षात मात्र १२० एमएलडीच पाणी शहरात दाखल होत आहे. त्यामुळे वाढीव मागणी आणि प्रत्यक्ष मिळणारे पाणी यात मोठी तफावत असल्याचेही पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com