Sambhajinagar News : वेशांतर करून पकडली चोरांची टोळी; १२ लाखांचा ऐवज केला पोलिसांनी जप्त

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा परिसर आणि अजिंठा परिसरात गॅरेज आणि इतर स्पेअर पार्टची दुकाने फोडल्याची घटना घडली होती.
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा परिसर आणि अजिंठा परिसरात गॅरेज आणि (Sambhajinagar) इतर स्पेअर पार्टची दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याचा तपस सुरु असताना पोलिसांनी (Police) वेशांतर करत चोरट्यांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

Sambhajinagar News
Maharashtra Politics: आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का! ९ पुतणे शरद पवार गटात प्रवेश करणार?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा परिसर आणि अजिंठा परिसरात गॅरेज आणि इतर स्पेअर पार्टची दुकाने फोडल्याची घटना घडली होती. या घटनेत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलीस या चोरट्यांच्या (Crime News) टोळीच्या शोधात होती. या दरम्यान सदरची टोळी मालेगावमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी चोरट्याना पकडण्यासाठी (Malegaon) मालेगाव गाठून तेथे मुक्काम करत त्यांच्या मागावर होते. वेशांतर करत सापळा रचला होता.  (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar News
Parbhani : शेतक-यांनाे! मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवस कापूस लिलाव राहणार बंद

१२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

मालेगावमध्ये असलेल्या या चोरांच्या टोळीला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेशांतर करत सापळा रचून मालेगावातून अटक केली. यामध्ये त्यांच्याकडून चोरी केलेला १२ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मालेगावमध्ये दोन दिवस मुक्काम ठोकत वेशांतर करून पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com