Online Fraud : ऑनलाइन कपडे खरेदी करणे पडले महागात; बँक खात्यातून एक लाख लंपास

Jalgaon News : अमळनेर शहरातील योगिता राकेश भामरे या महिलेने २२ नोव्हेंबरला सोशल मीडियावर असलेल्या साईडवरून कुर्त्याची ऑर्डर दिली.
Online Fraud
Online FraudSaam tv

अमळनेर (जळगाव) : ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. तरी देखील ऑनलाइन शॉपिंगचा (Online Shopping) मोह आवरला जात नाही. अशाच प्रकारे ऑनलाइन कुर्त्यांची ऑर्डर करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले असून बँक खात्यातून १ लाख रुपये चोरट्याने लंपास केले. (Breaking Marathi News)

Online Fraud
ATM Crime : एटीएमची अदलाबदली करून ३८ हजार रुपये लंपास; सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद

अमळनेर (Amalner) शहरातील योगिता राकेश भामरे या महिलेने २२ नोव्हेंबरला सोशल मीडियावर असलेल्या साईडवरून कुर्त्याची ऑर्डर दिली. २ डिसेंबरला ते पार्सल घरच्या पत्त्यावर येणार असल्याचा संदेश आला. मात्र मागविलेला कुर्ता आला नाही म्हणून महिलेने गुगलवर कुरियर ट्रेकिंग लिस्टवर जाऊन पार्सल का आले नाही म्हणून विचारणा केली. यावर पार्सल येण्यास अडचण निर्माण झाल्याचा रिप्लाय आला. (Online Fraud) पार्सल लवकर हवे असल्यास तुम्ही आमची फाईल क्लिक करून दोन रुपये आमच्या खात्यावर पाठविण्याचे सांगण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Online Fraud
Kalyan News : इमारतीवरील मोबाईल टॉवरला भीषण आग; नागरिकांची धावपळ

त्यानुसार योगिता भामरे यांनी दोन रुपये पाठवले. (Cyber Crime) यानंतर ५ डिसेंबरला त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून ९० हजार व ४ हजार ४९० रुपये कपात झाल्याचा संदेश आला. तसेच पोस्टातून पार्सलही आले होते. त्यानंतर महिला व तिचे पतीने स्टेट बँक, आरबीआय व केंद्रीय सायबर गुन्हे शाखेत ऑनलाइन तक्रार दाखल केला. मात्र, पैसे परत आले नाहीत. म्हणून पुन्हा स्टेट बँकेत विचारपूस केली असता पोलिसात तक्रार करण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार योगिता भामरे यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com