ATM Crime : एटीएमची अदलाबदली करून ३८ हजार रुपये लंपास; सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद

Washim News : पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाचे कार्डची अदलाबदल करून चोरटयांनी रक्कम काढून घेतल्याचे समोर आले आहे
ATM Crime
ATM CrimeSaam tv

मनोज जयस्वाल 

वाशिम : एटीएममध्ये फसवणूक करून रक्कम लांबविल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अशाच प्रकारे एटीएम कार्डाची (ATM Card) अदलाबदल करून खात्यातून ३८ हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे. ही घटना वाशीम शहरात घडली आहे. (Washim) या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

ATM Crime
Milk Subsidy : महिनाभराच्या कालावधीनंतरही अनुदान मिळेना; अनुदानाबाबत दूध उत्पादक शेतकरी संभ्रमात

वाशीम शहरात एटीएम मशिनमधून रक्कम लांबविल्याचा प्रकार घडला आहे. चोरटे एटीएम मशीनमधून (ATM Crime) लॉक तोडून, कटरच्या साहाय्याने मशीन तोडून रक्कम लांबवत असतात. तर एटीएम कार्ड धारकाची नजर चुकवून कार्डची अदलाबदल करून रक्कम लांबवीत असतात. असाच प्रकार वाशीम शहरात घडला असून. पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाचे कार्डची अदलाबदल करून चोरटयांनी रक्कम काढून घेतल्याचे समोर आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

ATM Crime
ACB Trap : परवाना नूतनीकरणासाठी १५ हजाराची लाच; महसूल सहाय्यक एसीबीच्या ताब्यात

सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद 

सराईत चोरट्याने एटीएम कार्डची अदलाबदली करत खात्यातून ३८ हजार रुपये लंपास केल्याची घटना समोर आली. वाशिम शहरातील एका एटीएममध्ये मोठ्या शिताफीने चोरट्यांने एटीएम कार्डची अदलाबदली करतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कार्ड अदलाबदली केल्यानंतर दुसऱ्या एटीएममधून ही रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी वाशिम पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com