ACB Trap : परवाना नूतनीकरणासाठी १५ हजाराची लाच; महसूल सहाय्यक एसीबीच्या ताब्यात

Bhandara News : तीन वर्षाने त्याचे नूतनीकरण करण्याचे आवश्यक असल्याने ११ डिसेंबर २०२३ ला परवाना नूतनिकरण शुल्क भरुन अर्ज दाखल केला होता.
ACB Trap
ACB Trap Saam tv

शुभम देशमुख 
भंडारा
: रिव्हॉल्वर परवाना नूतनीकरण करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यकास (ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे (Bhandara) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

ACB Trap
BJP Candidate : सातारा लाेकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काॅंग्रसेचा; उदयनराजे, शिवेंद्रराजे भूमिकेवर ठाम, आज निर्णयाक बैठक

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील (Bhandara Collector Office) महसूल शाखा दंड दोनच्या महसूल सहाय्य्क उमेश्वर गणवीर (वय ४०) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तुमसर येथील तक्रारदाराच्या नावाने ३२ बोर रिव्हॉल्वरचा परवाना आहे. २०२१ मध्ये सदर रिव्हॉल्वर परवानाचे नूतनीकरण केले होते. तीन वर्षाने त्याचे नूतनीकरण करण्याचे आवश्यक असल्याने ११ डिसेंबर २०२३ ला परवाना नूतनिकरण शुल्क भरुन अर्ज दाखल केला होता. मात्र अद्याप परवाना नूतनीकरण झालेला नव्हता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ACB Trap
Milk Subsidy : महिनाभराच्या कालावधीनंतरही अनुदान मिळेना; अनुदानाबाबत दूध उत्पादक शेतकरी संभ्रमात

परवाना नूतनीकरणाबाबत १८ मार्चला तक्रारदारने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक उमेश्वर गणवीर यांचेकडे चौकशीसाठी गेले होते. यावेळी उमेश्वर गणवीर यांनी परवाना नूतनीकरण करुन देण्याकरीता १५ हजार रुपयांची (Bribe) मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Bhandara ACB) तक्रार केली. तक्रारीची पळताळणी करून सापळा रचला. दरम्यान महसूल सहाय्यक उमेश्वर गणवीर याने १५ हजारांची लाच स्विकारतांना पथकाने अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com