Milk Subsidy : महिनाभराच्या कालावधीनंतरही अनुदान मिळेना; अनुदानाबाबत दूध उत्पादक शेतकरी संभ्रमात

Dharashiv News : सातत्याने घसरत असलेले दुधाचे दर आणि वाढत जाणारी महागाई यामुळे दुध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दुभत्या गाय व म्हशीला लागणार चारा, ढेप हे घ्यावेच लागत आहे.
Milk Subsidy
Milk SubsidySaam tv

बालाजी सुरवसे 

धाराशिव : दुधाला कमी दर मिळत असल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे दूध उत्पादक (Dharashiv News) शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शासनाने अनुदान देण्याची घोषणा केली आहे. परंतु प्रत्यक्षात या (Farmer) शेतकऱ्यांना अदयाप अनुदान मिळाले नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. या प्रकारामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे. (Latest Marathi News)

Milk Subsidy
Lok Sabha Elections 2024: आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकली अवकाळीची मदत; शेतकऱ्यांची प्रतिक्षा वाढली

सातत्याने घसरत असलेले दुधाचे दर (Milk Price) आणि वाढत जाणारी महागाई यामुळे दुध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दुभत्या गाय व म्हशीला लागणार चारा, ढेप हे घ्यावेच लागत आहे. चाऱ्याचे दर देखील प्रचंड वाढले असून तुलनेत दुधाला अपेक्षित दर मिळत नाही. (Milk) तर दुसरीकडे शासनाने जाहीर केलेले अनुदान देखील महीनाभरानंतर देखील शेतकऱ्यांना मिळाले नाही. यामुळे दुधासाठीचे जाहीर केलेले अनुदान मिळणार कि नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Milk Subsidy
Turmeric Price (March 2024): हळदीला मिळाला उच्चांकी भाव; उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान

कागदपत्र देऊन महिना उलटला 

अनुदानासाठी लागणारी सर्व कागदपत्रे दुध उत्पादक संस्थाना देवुन महीनाभराचा कालावधी लोटला आहे. तरीही अनुदान मिळाले नाही. तर वाढती महागाई पाहता शासनाने दुध दराबाबत ठोस धोरण राबविण्याची मागणी धाराशिव जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com